प्रथमेश जमदाडे चे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
पिलीव प्रतिनिधी (विश्वजीत गोरड) :
सदगुरू श्री श्री साखर कारखाना श्री श्रीनगर राजेवाडी मधील बांधकाम अभियंता अवधूत जमदाडे यांचा मुलगा व मेरी माता इंग्लिश हायस्कूल म्हसवड मधील विद्यार्थी प्रथमेश अवधूत जमदाडे याने 2021-22 मधील इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 228 गुण मिळवून शिष्यवृत्ती पटकावली असून विद्यालयाच्या व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
भविष्यातही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रथमेश याने यावेळी बोलून दाखवले. त्याला परीक्षेसाठी सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते , सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







