• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अंगणवाडीकरीता जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवा शिरपूर येथे अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी आमदार काशिराम पावरा

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in महाराष्ट्र
0
अंगणवाडीकरीता जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवा शिरपूर येथे अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी आमदार काशिराम पावरा

अंगणवाडीकरीता जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवा शिरपूर येथे अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी आमदार काशिराम पावरा

त-हाडी प्रतिनिधी


अंगणवाडी करिता जेवढे प्रस्ताव प्राप्त होतील तेवढे मंजूर होणार त्यामुळे गण-गटातील सदस्यांनी अंगणवाडी गाव-पाड्यावर राहिली असेल त्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावा़ बीडीओंनी ग्रामसेवकांना सूचना देवून त्याकडे लक्ष देण्याचे सूचित केले़ वंचित गावांमध्ये अंगणवाडी इमारत नसेल त्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावा असे प्रतिपादन आमदार काशिराम पावरा यांनी आदिवासी भागातील अंगणवाड्यांना वजनकाटे वाटपप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले़ १० रोजी येथील पंचायत समितीच्या विकासरत्न अमरिशभाई पटेल सभागृहात आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत अंगणवाड्यांना वजनकाटे, गरोदर वा स्तनदा महिलांना बेबीकिट तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेतांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला़

यावेळी जि़प़उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, सभापती लताबाई वसंत पावरा, उपसभापती विजय बागुल, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, तहसिलदार आबा महाजन, गटशिक्षणाधिकारी एफक़ेग़ायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ संजय कुंवर, माजी सभापती सत्तारसिंग पावरा, माजी उपसभापती धनश्री बोरसे, जि़प़सदस्य योगेश बादल, वसंत पावरा, यतिष सोनवणे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते़ बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे म्हणाले, ज्या गाव-पाड्यावर अद्यापपर्यंत अंगणवाडी नाही अशा गावाने अंगणवाडी मंजुरीसाठी व बांधकामासाठी प्रस्ताव पाठवावा़

वंचित असलेल्या गाव-पाड्यांवर लगेच अंगणवाडीची मंजूरी दिली जाईल़ सेस फंडातून आदिवासी भागातील २८९ अंगणवाडींकरीता २८९ वजनकाटे प्राप्त झाले आहेत़ यापूर्वी ५ हजार गरोदर वा स्तनदा मातांना बेबीकिटचे वाटप करण्यात आले आहे़ आता ही २५०० लाभार्थ्यांना वाटप केले जात आहे़ मात्र त्यासाठी ९ व्या महिन्याची गरोदर माता वा स्तनदा माताचे बाळ २ महिन्याच्या आतील असल्यास अशा लाभार्थ्यांना बेबीकिट दिले जात आहे़ तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेतचे देखील यापूर्वी १८ लाभार्थ्यांना लाभ दिला आहे़ आताही ९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ १ मुलगी असेल तर ५० हजार अन् २ मुली असतील तर प्रत्येकी २५-२५ हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे़ मुदत ठेव स्वरूपात हा निधी दिला जाणार आहे़ दर ६ वर्षाचे व्याज वापरता येणार आहे़ मुलगी १८ वर्षानंतर तो निधी काढता येणार आहे़ महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे म्हणाल्या, शिरपूर हा दुर्गम आदिवासी तालुका असून त्या भागातील बालकांचे वजन मोजण्यासाठी व त्या बालकांच्या माता-पितांना त्यांची प्रगतीचा आलेख समजण्यासाठी अंगणवाड्यांना वजनकाटे देण्यात येत आहेत़ विकासरत्न अमरिशभाई पटेल यांनी या तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे़

आता त्यांची धुरा आमदार काशिराम पावरा सांभाळत आहेत़ बालकांची पहिली पायरी ही अंगणवाडी असून त्यामुळे ती दुसरी आईच असते़ त्या आईची भूमिका सर्वांना बजवावी़ ती मुले नासमज असतात, त्यांना काही लिहिता-वाचता येत नाही़ बोलता ही येत नाही़ म्हणजेच अंगणवाडी हे दुसरे घर असते अशी भूमिकेतून सर्वांना काम करण्याचे आवाहन करण्यात आले़ मातृह्दय महिलांमध्ये असल्यामुळे सर्वच अंगणवाडी सेविका या महिलाच असतात, अशी शासनाची भावना आहे़ त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मुलांना चांगला पोषण आहार द्या, त्या मुलांच्या तब्बेतीकडे लक्ष द्या, त्यांच्या विकासाकडे लक्ष द्या आणि सर्व कामे करा असे देखील आवाहन त्यांनी केले़ आमदार काशिराम पावरा म्हणाले, बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे या तालुक्यात रूजू झाल्यापासून अंगणवाडीचे स्वरूप बदलले आहे़ कामे देखील चांगले होत आहेत़ शासनाच्या अनेक योजना असतात त्या योजना या तालुक्यात चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहेत़ आमदार कार्यालयात देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे़

विशेषत: आमदार अमरिशभाई पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे त्यांनी याकामी यंत्रणा, संगणक व ३० ते ३५ मुलांकडून ही कामे केली जात आहेत़ शासनाच्या विविध योजनांची माहिती गटनिहाय मुलांकडून कामे केली जात आहेत़

त्याच्या फायदा या तालुक्यातील सर्वांनी घेतला पाहिजे़ तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी देखील याकडे लक्ष देवून आपआपल्या गावातील लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ मिळून दिला पाहिजे़ लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे याची जाण ठेवून लाभार्थ्यांना लाभ मिळून द्या़ सुत्रसंचालन पी़आऱपाटील यांनी केले़

Views: 101
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गोमेवाडीत ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न

गोमेवाडीत ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)