• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

गोमेवाडीत ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in सांगली
0
गोमेवाडीत ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न

गोमेवाडीत ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न


आटपाडी प्रतिनिधी
गोमेवाडी ता.आटपाडी येथे ग्रामीण स्त्री शक्ती संस्था व CBRTI पुणे, (केंद्रीय मधमाशी अनुसंधान प्रशिक्षण संस्था )सेवावर्धिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात प्रथमतःच “मधमाशी पालन प्रशिक्षण” गोमेवाडी येथे ५ दिवसीय घेण्यात आले.


त्यासाठी CBRTI चे ट्रेनर राहुल देवल यांनी मार्गदर्शन पाच दिवस प्रात्यक्षिकासह केले. यामध्ये मधमाशी पालन उद्योग एक शेतीपूरक व्यवसाय असं वारंवार सांगितले. शेतीमध्ये मधमाशांचे महत्त्व, त्यांच्या जाती, प्रकार, योग्य क्षेत्र, तसेच त्यांचे व्यवस्थापन, मध व मधमाशी पासून मिळवली जाणारी अन्य उत्पादने, त्यांचा रोग, लक्षणे, शत्रू, मधमाशी पालनाचे अर्थ शास्त्र, मधमाशी पालन याविषयी च्या योजना या सर्वाची इतंभूत माहिती प्रशिक्षक राहुल देवल यांनी ५ दिवसांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी यांना मनमोकळेपणाने दिली व सर्वामध्ये मधमाशी पालन याविषयी जागरूकता निर्माण केली.
प्रत्यक्ष कृती द्वारे मधमाशी विषयी सर्व माहिती सांगितली व प्रशिक्षणार्थी यांना मधमाशी वसाहत कृती युक्त हाताळायला लावले. जेणेकरून मधमाशी विषयी भिती राहणार नाही. झाडावरील मधमाशांचे पो़ळे न काढता मध काढणे इथपर्यंत कृती युक्त प्रशिक्षण सहभागी प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. पुण्याहून CBRTI चे सहसंचालक सुनील पोकरे उपस्थित होते तर सेवावर्धिनी चे राजेंद्र पाटील उपस्थित होते.

सहसंचालक पोकरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना परागीभवनासाठी शेतात मधमाशी किती उपयुक्त आहे याविषयी सांगितले. मधमाश्या वाचल्या तरच मनुष्य वाचेल असे २० व्या शतकातील शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा गौरव झाला आहे असे प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी नोंद केली आहे असे सांगितले. तर शेती परिवार चे प्रसादराव देशपांडे यांनी मधमाश्यांची सामूहिकता जशी आहे तशीच सामूहिकता सर्व प्रशिक्षणार्थी नी ठेऊन मधमाशी विषयी समाजात जागरूकता निर्माण करावी. तिचे संरक्षण करून तिच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजनां ही सामुहिक रित्या च राबविण्यात याव्यात व ज्याचा शेतीला व आपोआप आपल्या ही अर्थार्जनासाठी उपयोग होईल. असे सांगितले. तर कृषी विभागातील आत्मा चे प्रशांत पाटील यांनी यासाठी असणाऱ्या योजना व त्याची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.


संस्था सतत प्रयत्न शील असते शेतीपूरक प्रशिक्षण देण्यासाठी व शेतकरी वर्गात जागृती करण्यासाठी. असा विशेष करून उल्लेख केला. पुण्याहून प्रशिक्षणाला भेट देण्यासाठी आलेले मधुकर भोसले यांनी अशा शेती विषया संबंधित असणाऱ्या विविध पूरक व्यवसाय प्रशिक्षणांसाठी महिला संस्था कार्यरत आहे ही बाब विशेषतः उल्लेखनीय अशीच आहे असे मत व्यक्त केले.
शेतीसाठी मधमाशी पालन करणे ही काळाची गरज आहे यासाठी सर्वानीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. आजच्या या प्रशिक्षणार्थी मधून याची किती आवश्यकता आहे असे यांच्या कडूनच दिसून आले. असे सांगितले.
प्रशिक्षणार्थी मधून डाळिंब बागायतदार श्री आनंद कदम यांनी मधमाशी ही शेती साठी किती उपयुक्त घटक आहे ते आज या प्रशिक्षणामुळे आम्हांला समजले नक्कीच. यासाठी ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हांला ही संधी आमच्या गावात उपलब्ध करून दिली. हे आमचे भाग्यच.नक्कीच आम्ही मधमाशी विषयी काळजी घेऊ व शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी ती किती महत्वपूर्ण आहे हे इतरांनाही सांगू. असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.

तर सीमा पडळकर यांनी ही
मधमाशी पालन हे फक्त वाचून होते परंतु प्रत्यक्षात प्रशिक्षण घेतल्यानंतर समजले मधमाशी पालन हा व्यवसाय ही हो़ऊ शकतो व त्यापासून विविध उत्पादने ही घेता येतात. यासाठी फार काही कष्ट करण्याचे कारण नाही. फक्त वसाहतीची काळजी घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी प्रशिक्षणामुळे च समजले हे संस्थेने आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी व भगिनींसाठी ठेवले होते. त्याचा फायदा आम्हां शेतकरी वर्गाला नक्कीच होईल व तो आम्ही करू असे सर्वाच्या वतीने सांगितले. व ग्रामीण स्त्री संस्थेचे मन:पूर्वक आभार मानते की या संस्थेमुळे आम्हां महिला वर्गाला हे प्रशिक्षण घेता आले.
मनिषा खांडेकर यांनी मी मधमाशी पालनाविषयी सतत माहिती घेत होते परंतु महाबळेश्वर, पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन रू. १००००/- ते १५०००/- खर्च करून आठ दिवस निवासी प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते. परंतु ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले व आम्हाला हे प्रशिक्षण इथे उपलब्ध करून दिले.

संस्थेच्या श्रीमती सुनेत्रा देशपांडे कुलकर्णी यांचा फोन मला येताच मी न फार काही विचार करता लगेच मी येईन प्रशिक्षणाला असे सांगितले व ५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. शेतीसाठी या मधमाशांचे महत्त्व किती व कसे हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे व पाहिले आहे. म्हणून मला हे प्रशिक्षण घ्यायचे होते व इतरांनाही त्याचे महत्त्व सांगायचे होते ते आज या प्रशिक्षणामुळे शक्य झाले. यामधील सर्व बाबी राहूल देवल सरांनी अगदी उत्तमरित्या समजावून सांगितल्या व आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत तत्पर असल्याचे सांगितले. आम्हां सर्व प्रशिक्षणार्थी साठी गेले ५ दिवस हे प्रशिक्षण म्हणजे एक उत्साह, आनंद, वेगळीच अशी उत्सुकता अशा स्वरूपाचे होते. यामुळे मधमाशांकडे पहाण्याची सर्वाचीच दृष्टी यामुळे बदलली. असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन श्रीमती सुनेत्रा देशपांडे-कुलकर्णी व गायत्री कुलकर्णी यांनी केले होते. तर सूत्रसंचालन मनिषा देशपांडे व प्रास्ताविक स्मिता पोफळे यांनी केले.

Views: 279
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
ब्रह्मचैतन्यच्या गजराने अवघी दुमदुमली कारुंडे नगरी थोर संत हेच समाजाचे खरे हिरो रामराजे निंबाळकर

ब्रह्मचैतन्यच्या गजराने अवघी दुमदुमली कारुंडे नगरी थोर संत हेच समाजाचे खरे हिरो रामराजे निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)