• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

माणगंगा by माणगंगा
November 14, 2022
in महाराष्ट्र
0
बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

बालदिनी सखी श्रावणीतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

भुसावळ – तालुक्यातील दर्यापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, भुसावळ गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ संजय गायकवाड, श्रीकौशल काॅमर्स अकॅडमीच्या संचालिका मिस संगिता लुल्लु यांची उपस्थिती होती. दर्यापूर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक भिमराव गोसावी यांनी केले.

बालकांच्या हातुन केक कापून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री नेवे म्हणाल्या की, 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यंदा बालकांना पोषक भोजनासह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. भविष्यात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंची मदत नक्कीच दिली जाईल. गरजेची वस्तू बालकांना मिळाल्यावर बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूपच वेगळा असतो व त्यामुळेच आपल्याला आनंद मिळत असल्याचेही सौ.राजश्री नेवे यांनी आपले मत व्यक्त केले.

संगीता लुल्लु म्हणाल्या की, बालकांना अभ्यासाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास, स्वच्छता, परिस्थितीनुसार त्यांच्या गरजा काय आहेत याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही जागृत नागरिक म्हणुन फुल न फुलाची पाकळी मदत विद्यार्थांना नक्कीच करत जाऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान म्हणाले की, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज बालकांसाठी जो उपक्रम राबविला आहे, तो अतिषय प्रशंसनीय व विद्यार्थांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देणारा आहे. सौ. राजश्री नेवे यांनी खरोखर विद्यार्थांसाठी हा जो बालदिन उत्साहात साजरा केला आहे तो अतिशय सुंदर आहे. त्यांचे कार्य खूप छान आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचेही श्री. प्रधान म्हणाले. कार्यक्रमासाठी बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांनी तर आभार भुसावळ गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ संजय गायकवाड यांनी मानले. यावेळी कांचन शंभानी, रचना छाछड, सिमर तेजवानी, उपासना फिरके, रोशन आगिचा, क्रिष्णा अगनानी, लकी मुलचंदानी, निखिल देसाई यांची उपस्थिती होती.

Views: 194
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
काँग्रेसचे निष्ठावंत जेस्ट नेते रामराव दादा पाटील यांचे निधन

काँग्रेसचे निष्ठावंत जेस्ट नेते रामराव दादा पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)