काँग्रेसचे निष्ठावंत जेस्ट नेते रामराव दादा पाटील यांचे निधन
कॉंग्रेसचे निष्ठावंत जेस्ट नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आदरणीय व्यक्तिमत्व रामराव (दादा) पाटील (वय वर्षे ८५) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे आज. सोमवारी सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी निधन झाले. दादांच्या अकाली जाण्याने आदर्श व्यक्तिमत्व हरपले . मंगरुळसह परिसरावर शोककळा पसरली
रामराव दादा पाटील यांनी आपल्या मंगरुळ गावातून राजकारणास सुरुवात केली. ते ग्रामपंचायतीचे १० वर्षे सरपंच होते. त्यानंतर खानापूर पंचायत समितीचे उपसभापती, सभापती म्हणून काम केले. खानापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे स्थापनेपासून संचालक, सांगली येथील भारत सहकारी सुतगिरणीचे संचालक, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य, खानापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यासह अनेक पदांवर दादांनी काम केले आहे. विशेष म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत कोणतीही व्यक्ती असो, दादा त्यांना अगदी झोकून हात जोडून नमस्कार करीत, आजात शत्रू व्यक्तीमहत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा कॉंग्रेस पक्षाच्या जडन घडणीत सिंहांचा वाटा आहे. कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ म्हणून जिल्ह्यात दादांचे नाव घेतले जात होते.
. गुडघ्यात त्रास होवू लागल्याने त्यांना पुणे येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चांगली होती, ,मात्र सकाळी ९वाजून २१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी सुसंस्कृत कुटुंब घडविले. कुटुंबात चौघे डॉक्टर तर, चौघे इंजिनिअर झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, नातवंडे, परतांडे असा मोठा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, इंजिनिअर विलासराव पाटील यांचे ते वडील होत. अंत्यविधी आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता मंगरुळ येथे होणार आहे.







