तऱ्हाडी येथील विद्यार्थीची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड
तऱ्हाडी:-शिरपूर तालुक्यातील स्व. अण्णासाहेब साहेबराव पाटील व ज्युनिअर सायन्स कॉलेज तऱ्हाडी येथील एक विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी विद्यार्थ्यांच्या शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
शिरपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे झालेले तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्व.आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु सायन्स कॉलेज तऱ्हाडी येथील विद्यार्थी प्रशांत दिलीप कोळी हा ७० किलो वजन गटात तालुकास्तरावर विजय होऊन जिल्हास्तरावर निवड झाली आहे
त्याला क्रीडा शिक्षक आर एस चव्हाण व भावेश पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले यशस्वी खेळाडू चे संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे व मुख्याध्यापक एन एच कश्यप प्राचार्य नितीन पाटील व ए. एम सोनवणे यांनी त्यांचे कौतुक केले







