स्व.आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे शिक्षकेत्तर कर्मचारी कृतज्ञता दिन साजरा
तऱ्हाडी:-येथील
स्व.आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय येथे शिक्षकेत्तर कर्मचारी कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील वरीष्ठ लिपिक संजय साळुंखे होते यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक एन एच कश्यप व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
यावेळी वरीष्ठ लिपिक संजय साळुंखे कनिष्ठ लिपिक शांताराम करंके शिपाई अंबर भिल. राजेंद्र कुलकर्णी. रवींद्र सोनवणे. नितीन सांळुके . राजेंद्र पाटील यांचा शिक्षकेतर कर्मचारी दिवसानिमीताने उपाध्यक्ष मान्यवरांच्या हस्ते स्नेहवस्त्र क् श्रीफळ गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला व शिक्षकेतर कर्मचाऱ्यान बद्दल मुख्याध्यापक यांनी इयत्ता दहावीच्या मराठी च्या पुस्तकाच्या अभ्यासक्रमात समावेश असलेल्या आप्पांनचे पत्र यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या आप्पानचे पत्र याचासंदर्भ देऊन उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी काम केले पाहिजे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस चव्हाण व आभार ऐ. के. पाटील यांनी मानले







