गुरुजी, पुस्तक शिकविण्यापूर्वीच वही संपली तर?
दोन मतप्रवाह : पुस्तकांमध्ये वहीची कोरी पाने जोडण्याचा शासनाचा विचार
त-हाडी. / महेंद्र खोंडे
शालेय शिक्षण विभागाकडून पुस्तकांमध्येच वहीची कोरी पाने जोडण्याबाबत विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे..त्यासंदर्भात बालभारतीमार्फत प्रश्नावलीच्या स्वरुपात शिक्षकांकडून मते मागविण्यात आली आहेत. मात्र, यावरून समाजामध्ये दोन मतप्रवाह समोर आले आहेत.
हा प्रयोग अमलात आला, तर विद्यार्थ्यांना लिखाणासाठी नव्याने वह्यांची खरेदी करावी लागणार नाही. तसेच शाळेत दररोज पुस्तकांसोबतच वह्यासुद्धा घेऊन जाण्याची गरज राहणार नाही. पण, अभ्यासक्रम संपण्यापूर्वीच पुस्तकातील कोरी पाने संपली तर.., हा प्रश्न पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनाही पडला आहे.
मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडल्यास गृहपाठासाठी, नोट्स काढण्यासाठी, विद्यार्थ्यांना स्वतंत्र वही बाळगण्याची आवश्यकता
राहणार नाही. शिवाय, एकाच विषयाची वेगवेगळी टिपणे काढण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होईल, असा मतप्रवाह समोर आला आहे
दुसरीकडे, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. मागील वर्षीपासून एकात्मिक पुस्तके आली. एकाच पुस्तकात तीन-चार विषय एकत्र देण्यात आले आहेत.
मात्र, त्यात आता वह्यांची पाने जोडल्यास त्या पुस्तकांचे वजन वाढणार नाही का? गृहपाठाला किती पाने द्यायची, असाही एक विचार पुढे आला आहे.
चौकट
या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित
प्रतिक्रिया
गृहपाठ तपासण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या गृहपाठाच्या वह्या शिक्षक स्वतःकडे एक-दोन दिवस ठेवून घेतात. भविष्यात पुस्तकांमध्येच वह्यांची पाने आल्यास वह्या तपासण्याचा पेच निर्माण होऊ शकतो.
प्रतिक्रिया
जितेंद्र बालु सोनवणे पालक त-हाडी ता शिरपुर जिल्हा
पुस्तकात नेमकी किती कोरी पाने देणार. विद्यार्थ्यांना नोट्स काढण्यासाठी किंवा गृहपाठ करण्यासाठी किती पाने लागू शकतील, याचा अंदाज कसा बांधणार..
प्रतिक्रिया
गणिताचा सराव करण्यासाठी वहीचीच पाने कमी पडतात, तर पुस्तकातील मोजकी पाने कशी पुरतील.
,
पांडुरंग सिताराम चव्हाण पालक त-हाडकसबे ता शिरपुर जिल्हा धुळे
प्रतिक्रिया
ओझे कमी कसे होईल?
पुस्तकांत कोरी पाने देण्याचा, पाठ्य पुस्तकात जोडून वह्यांची पाने लावण्याचा निर्णय खरेतर विद्यार्थ्यांना अडचणीचा, चुकीचा व अत्यंत तर्कहीन आहे. हा निर्णय झालाच तर पुस्तक लवकर फाटेन व पृष्ठ संख्या वाढेल. पाठ्यपुस्तकांचे वजन वाढेल. मग दप्तराचे ओझे कसे कमी होईल ?
मुख्खाध्यापक
गणेश यादवराव पवार
जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी ता शिरपुर जिल्हा धुळे
प्रतिक्रिया
पुस्तकात कोरी पाने जोडण्याऐवजी विद्यार्थ्यांना वह्यांचा पुरवठा करावा. अथवा स्वाध्याय पुस्तिका स्वतंत्रपणे देणे हाच सर्वात व्यावहारिक पर्याय आहे, त्यामूळे तपासणीच्या दिवशी केवळ स्वाध्याय पुस्तिका शाळेत येतील परिणामी दप्तराचे ओझे कमी होईल. शासनाने यावर गांभीर्याने विचार करावा.
रावसाहेब चव्हाण
सहशिक्षक व शिक्षणतज्ञ
कै, आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी
चौकट
पाठ्यपुस्तक आणि कोरी वही एकत्रच
पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची कोरी पाने जोडण्याचा विचार शासन करत आहे. दप्तरांचओझे कमी करण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा. २६८ आहेत
मुली- ११४४६
मुले-११६९१
एकुण -२३१३७
प्रतिक्रिया
पाठ्यपुस्तक व वही एकत्र करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय सुरू आहे हा विद्यार्थी हिताचा घेतांना शासनाने दोन्ही बाजुचा निर्णय झाला पाहिजे दोन्ही घटक एकत्र केल्यास विद्यार्थीला पाठ्यपुस्तकातील वाचन व वही मध्ये लेखन करताना अडचण येतील त्यापेक्षा विषयानिहय स्वतंत्र पुरवठा केला
पाहिजे दोन्ही बाजु एकत्र केल्यास दप्तराच्या ओझाबाबत खुप फरक पडणार नाही पाठ्यपुस्तक व वही एकत्र केल्यास पुस्तकाचे आकारमान वाढुन विद्यार्थीला असे वहीवजा पुस्तक हाताळताना खूप अडचण येतील आकारवाढीव मुळे पाठ्यपुस्तक वर्षभर हाताळताना पाठ्यपुस्तकाच्या टिकाऊ बाबत अडचणी येतील शिक्षकांना वही तपासणी करताना अडचण येतील विद्यार्थीना पाठ्यपुस्तक वाचन करतांना उपलब्ध होऊ शकत नाही
एकावेळी कोणतेही एकच काम होईल विद्यार्थीच्या गुणवत्तेवर खूपच परिणाम होईल ग्रामीण, दुर्गम,आतीदुर्गम भागातील पालकांना आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करण्याबाबत खूपच अडचणीचा सामना करावा लागेल म्हणून शासनाने विद्यार्थीना स्वतंत्रपणे वह्या व पुस्तकांचा केला पाहिजे
राजेंद्र यशवंत पाटील
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद शाळा डाबक्यापाडा ता शिरपुर जिल्हा धुळे







