औरंगाबाद हायकर्स ग्रुपची महाराष्ट्राचे एवरेस्ट कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई
औरंगाबाद प्रतिनिधी- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्या जवळील महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले शिखर ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट संबोधले जाते अशा अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक कळसुबाई शिखरावर औरंगाबाद हायकर्स ग्रुपच्या गिर्यारोकांनी नुकतीच यशस्वी चढाई केली.
या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून (5400फुट) म्हणजेच 1664 मीटर एवढी आहे, या ग्रुपच्या सदस्यांनी भल्या पहाटे सकाळी चार वाजता किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाश झोतात शिखराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य अशा बारी गावापासून या शिखर चढाई मोहिमेला प्रारंभ केला, आणि या खडतर आणि अत्यंत अवघड असलेल्या सर्व सदस्यांनी आठ वाजून पंधरा मिनिटांनी कळसुबाईचे महाराष्ट्रातील अत्यंत उंच आणि अवघड असलेल्या शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा ध्वज फडकविला.
महाराष्ट्रातील हे शिखर सर्व पर्वत रांगांमध्ये अत्यंत अवघड आणि उंच समजले जाते, निसर्गाचे वातावरण स्पष्ट असेल तर या शिखरावरून आजूबाजूचे हरिचंद्र गड, रतनगड ,हरिहर गड, सांदण व्हॅली साम्रद आदी या परिसरातील निसर्गरम्य दृश्य नजरेस पडतात. सकाळचा सूर्योदय बघण्यासाठी साहसी ट्रेकर ची या ठिकाणी रात्रीपासूनच शिखरावर चढायची मोहीम सुरू होते, औरंगाबाद हायकर्स ग्रुपचे प्रमुख रतन राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, तर मोहिमेचे नेतृत्व साहिल सिंग राजपूत यांनी केले,
रतन राऊत यांच्यासह या मोहिमे मध्ये साहिल सिंग राजपूत, ज्योती सिंग राजपूत ,डॉ.बेबी सिंग, मंगल राऊत ,दादासाहेब पानमंद ,दिलीप भंगाळे ,जयश्री भगाळे ,संजना भंगाळे, प्रमोद शेळके , विजय औटी ,राजेंद्र नारळे ,प्रतिभा नारळे ,अनुष्का नारळे ,अनिकेत नारळे, अविनाश आडसकर, प्रवीण बोडखे, साधना बोडखे, सोहम बोडखे, सई बोडखे ,किरण वनगुजर, सुवर्णा वनगुजर ,जयश्री कोळपकर, तनिष्का कोळपकर, आधी गिर्यारोहक सहभागी झाले होते.







