तऱ्हाडी विद्यालयात कष्टाची भाकरी हा उपक्रम राबविला
तऱ्हाडी:- येथील आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे कष्टाची भाकरी या उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यी यांनी सहभाग घेतला या उपक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी घरून भाकरी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तवा, सरपण.पीठ.इतर साहित्य आणले व विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी चुलीची मांडणी करून स्वता आपल्या हाताने भाकरी तयार केल्या हा उपक्रम राबविण्या मागे एकच उद्देश आहे की स्वयंशिस्त विद्यार्थ्यांना लागावी यासाठी कष्टाची भाकरी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण शिंदे.भावेश पाटील. संतोष आडगाये यांनी परीश्रम घेतले यावेळी संस्थेचे सचिव विजय भामरे .अध्यक्ष सुभाष भामरे.मुख्याध्यापक एन एच कश्यप. प्राचार्य एन. बी.पाटील.ए.एम.सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते







