आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम उत्कृष्ट .. प्रदेश सचिव व पक्ष निरीक्षक -अक्षय भांड
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक आटपाडी येथे पार पडली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व पक्ष निरीक्षक अक्षय भांड हे बोलताना म्हणाले की आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चांगल्या पद्धतीने काम करत आहे
येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुरज पाटील व त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी युवक च्या माध्यमातुन ताकतीने उतरतील निरीक्षक म्हणून मी सर्व ती मदत करेन असे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी प्रदेश सचिव नारायण खरजे यांनी संघटना मजबूत करत असताना आपल्या घरापासून गावापासून सुरवात करावी तर संघटना मजबूत होते त्या साठी मी ही तुमच्या बरोबर झोकुन देऊन काम करेन असे म्हणाले.
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन ताकतीने लढू व जिंकू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी दिघंची गावचे युवा नेते ऋषिकेश गुरव यांची फेरनिवड करण्यात आली
ऋषिकेश गुरव , कामत गावचे सरपंच परशुराम सरक, अतुल पाटील ,प्रशांत मोठे ,किशोर गायकवाड, रणजित पाटील,विशाल चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी मनोज भोसले, विशाल जाधव ,नितीन डांगे, दिपक पाटील, प्रशांत मोठे, दत्तात्रय रावळ, सत्यवान थोरात , राहुल साळुंखे ,सागर सोहनी संतोष बाड, अमित मोरे आशिष जाधव , हिम्मत डबडे, यांच्या सह अनेक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते







