आता ‘ह्या’ १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची शिरपूर तालुक्यात प्रतीक्षा ; व्युव्हरचनेला आली गती
त-हाडी : प्रतिनिधी –
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे शिरपूर तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता निवडणुका घेण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने लवकरच ह्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता वाढली आहे. शिरपूर तालुक्यातील १९ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आगामी काळात सुरु होणार असल्याची चिन्हे आहेत.
सध्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात असून यामुळे अनेक गावपुढाऱ्यांची गोची झालेली आहे. ह्या निवडणुकीसाठी सर्वांनी पूर्वतयारी आधीपासूनच केलेली आहे. गावाची सत्ता अबाधित राखण्यासाठी आणि सत्तेचे परिवर्तन करण्यासाठी ग्रामीण भागात व्युव्हरचना करण्यात आलेली आहे. सध्या तालुका प्रशासनही मोकळे झाले असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात एकाचवेळी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. महायुतीला सर्वत्र चांगले वातावरण असल्याने शिरपूर नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. कदाचित ग्रामपंचायत निवडणुका मागे ठेवून अन्य निवडणुका आधी घेतल्या जाऊ शकतात.
शिरपूर तालुक्यातील ,वासडी , वाडी बु¡. त-हाडी, नवे भामपुर, भरवाडे , भोरडेक, आढे, जयतपुर,पिप्री, सावेर गोदी,पिळोदा, जापोरा, वनावल,रुदावली, सुभाष नगर, अंजदे खु! अहिल्यापुर, टेभे बु! चांदपुरी,
ह्या १९ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. आगामी काही काळात ह्या गावांची निवडणूक घोषित होईल असा अंदाज आहे. ग्रामीण भागात ह्या निवडणुकांची सर्वांना चांगली प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागात उत्साह असून निवडणुका चांगल्याच चुरशीच्या होतील असेही बोलले जाते आहे.