मजूर, हमाल व बूट पॉलिश करणाऱ्या हजारोंना अन्नधान्य किट वाटप
(लवकरच स्टीमर मशीन चे वाटप करणार)
मुंबई दि (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) व सम्यक महाराष्ट्र न्यूज च्या वतीने हातावर पोट असणारे मजूर, हमाल व रेल्वे फलाटावर बूट पॉलिश करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारोंना महिन्याभराच्या रेशन किट चे वाटप करणयात आले.
दिवंगत पँथर माजी आमदार टी.एम कांबळे व दिवंगत जेष्ठ आंबेडकरी समाजसेवक ईश्वर कांबळे यांच्या स्मृतिपित्यार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व सम्यक महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीने लॉक डाऊन च्या पहिल्या दिवसापासून दररोज शेकडो लोकांना पौष्टीक अन्न शिजवून त्यांची भागविण्यात येत आहे.
काही दानशूर व्यक्तिमत्वाच्या मदतीने अन्नधान्य किट चे वाटप करण्यात येत असून यापुढेही कोणी उपाशी झोपू नये याची काळजी घेतली जात आहे, कुणाला गरज असल्यास ना लाजता संपर्क साधन्याचे आवाहन डॉ. राजन माकणीकर यांनी केले असून साधा फोटो सुद्धा आम्ही काढत नसल्याचे सांगितले.
स्टीमर ची मागणी बऱ्याच गरजूंनि केली असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्टीमर काळाची गरज असल्यामुळे आठवडाभरात गरजूंना उत्तम क्वालिटीचे स्टीमर पुरवणार असल्याचा आशावादही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.
पूज्य भदंत शिलबोधी, पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भाई विजय चव्हाण, प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे राज्य महासचिव कॅ.श्रावण गायकवाड यांच्या नियोजनाखाली ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, ५ कीलो सोलापुरी ज्वारी, 3 किलो साखर, १ किलो मसूर डाळ, १ किलो मूग डाळ, १ तूर डाळ, १०० ग्राम चहा, १०० हळद, १ किलो मीठ, ६ रिण साबण, १ किलो सर्फ एक्सेल, 3 सिंथॉल, ३ लिटर फॉर्च्युन तेल, २०० ग्राम कोलगेट, १०० ग्राम पॅराशूट तेल, १ पार्ले फॅमिली पॅक व अन्य… अश्याप्रकारे किट वाटप करण्यात आली व पुढेही जशी मागणी होईल तश्या किट वाटप करण्यात येतील असे आश्वासन डॉ माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिले.