राजेवाडीत किरकोळ भांडणातून एक जण ठार
राजेवाडी ता. आटपाडी येथे गणेश उत्तमराव मुंगल रा. खैरगाव ता .अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असून त्याने राजेवाडी हद्दीमध्ये राजेवाडी ते हिंगणी जाणाऱ्या रोडलगत किरकोळ वादातून रागाच्या भरात हनमंत लक्ष्मण नागरगोजे यांच्या डोकीमध्ये ट्रक मधील लोखंडी टॉमी घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .
याबाबत चंद्रकांत तुकाराम भोसले मुक्काम पोस्ट हिंगणी ता. माण जिल्हा सातारा व्यवसाय वीट भट्टी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत







