बहुजन ह्रदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून दिघंची साठी 60 लाखाचा निधी – युवा नेते – शेखर रणदिवे
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विनंतीवरून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी दिघंची गावातील विविध विकास कामांसाठी 25 /15 योजने अंतर्गत एकूण 60 लाखाचा निधी दिला आहे यामध्ये पुढील कामांचा समावेश आहे
1)विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी 5 लाख रुपये
2)बडे बाबा मंदिर वडार गल्ली येथे सभागृहासाठी 5 लक्ष रुपये
3)दिघंची गावचे ग्रामदैवत महादेव मंदिर येथे सभागृह बांधणे 20 लाख रुपये
4)नागोबा मंदिर येथे सभागृह बांधणे 10 लाख रुपये
5)साळी समाज येथे संरक्षक भिंत बांधणे 10 लाख रुपये..
6)दिघंची मसवड रोड येथील महादेव मंदिरासमोर सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये…
असा एकूण 60 लक्ष रु निधी मंजूर केला आहे
दिघंची गावासाठी निधी मंजूर केल्याबद्दल बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे व त्यांच्या कार्याची कौतुक होत आहे अशी माहिती दिघंची गावचे युवा नेते शेखर रणदिवे यांनी दिली







