विभूतवाडीतील सभामंडपासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी – सरपंच चंद्रकांत पावणे
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विनंतीवरून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी विभूतवाडी गावातील विविध मारुती मंदिरा समोरील सभा मंडपासाठी विकास कामांसाठी 25 /15 योजने अंतर्गत एकूण 10 लाखाचा निधी दिला आहे .
यापूर्वीही आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या माध्यमातून भरघोस निधी दिलेला आहे व पुढील काळामध्ये सुद्धा लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द पडळकर बंधूनी दिला आहे, अशी माहिती सरपंच चंद्रकांत पावणे यांनी दिली







