आमदार अनिल भाऊ बाबर गटाला धक्का
पिंपरी बुद्रुकचे आमदार अनिल भाऊ बाबर गटाचे कट्टर समर्थक विनोद तरसे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आटपाडी प्रतिनिधी
आमदार अनिल भाऊ बाबर गटाला धक्का पिंपरी बुद्रुकचे आमदार अनिल भाऊचे कट्टर समर्थक विनोद तर्फे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश प्रवेश करण्यात आला
झरे येथील गेस्ट हाऊस येथे शिवसेनेचे विनोद तरसे, दशरथ जावीर, गणपत पवार, नामदेव तरसे, विलास तरसे, हरिराम पवार, दगडू जाधव, बाबूराव तरसे, प्रकाश तरसे, महादेव ऐवळे, शिवाजी तरसे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर ,रामचंद्र दादा डिसले, सरपंच माणिक पाटील, नंदकिशोर माने, बाळु डिसले, विजय माने, सुरज पवार, सुरेश माने, ओंकार कुलकर्णी तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते







