• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कुंपणानेच शेत खाल्ले आटपाडीच्या वन विभागातील प्रकार – चौकशीची मागणी

माणगंगा by माणगंगा
November 25, 2022
in सांगली
0
कुंपणानेच शेत खाल्ले आटपाडीच्या वन विभागातील प्रकार – चौकशीची मागणी

कुंपणानेच शेत खाल्ले आटपाडीच्या वन विभागातील प्रकार – चौकशीची मागणी

आटपाडी प्रतिनिधी


कुंपणानेच शेत खाल्ले अशी एक प्रसिद्ध म्हण आहे, म्हणजे ज्यांना संरक्षणाची जबाबदारी दिली जाते त्यांनीच त्याला संपवणे असा त्याचा अर्थ होतो, असेच काही आटपाडीच्या वन विभागामध्ये सुद्धा सुरू आहे .उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आटपाडी तालुक्यातील मिटकी येथे ऑगस्ट महिन्यामध्ये 8 हेक्टर वनक्षेत्रावर 8 हजार 8,0088(आठ हजार अठ्याऐंशी) झाडांची लागवड करण्यात आली होती मात्र या लागवडीमध्ये मोठा गैरप्रकार झालेला आहे.

वृक्ष लागवड करत असताना शासनाने काही नियम ठरवून दिलेले आहेत ,त्यामध्ये झाडे लावत असताना खड्डे महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत मजुराकडून खोदावयाचे आहेत, मात्र या ठिकाणी मजूर फक्त कागदोपत्री दाखवून जेसीबी आणि पोकलेन च्या साह्याने खड्डे खोदलेले असून यामध्ये यंत्रधारकांना जो दर ठरवून दिला आहे, त्या दरापेक्षाही कमी दराने त्यांना कामाचा मोबदला देऊन उरलेले पैसे या विभागावर देखरेख करणारे वनपाल,वनक्षेत्रपाल व महिला वनरक्षक अधिकारी यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातलेले आहेत.


त्याचबरोबर खड्ड्यांची लांबी रुंदी आणि खोली शासनाच्या नियमानुसार नाही ,शासनाच्या नियमाप्रमाणे खड्डा किमान दीड फूट खोल असावा मात्र या ठिकाणी काही खड्डे अर्धा फूट इतकेच आहेत ,खड्ड्यांमध्ये माती भरायची असते त्यामध्ये खते टाकायची असतात मात्र असं कोणतंही काम झाल्याचं दिसत नाही, त्यामुळे या ठिकाणी अपूर्ण खड्डे व त्यामध्ये झाड जगलं अशी माती नसल्यामुळे या खड्ड्यामध्ये लावलेली बहुतांश झाडे जळून गेलेली आहेत.


त्याचबरोबर या झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाजूने कुंपण करायचे असते तेही येथे दिसत नाही. झाडांना सुरुवातीला पाणी द्यायचे असते हे पाणी देण्यासाठी सुद्धा येथील महिला वनरक्षक अधिकाऱ्यांनी एका मध्यस्थीच्या मदतीने स्वतःच पाण्याचा ठेका घेतलेला आहे .शासकीय कर्मचाऱ्याला स्वतः ठेका घेता येत नाही, तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या सोयीस्करपणे यातून मार्ग काढलेला आहे, मात्र हे पाणी झाडाला न देताच टँकरचे बिल खिशात घातले जात आहे.

वृक्ष लागवडीसाठी शासनाकडून साधारणपणे एका हेक्टरला पहिल्या एका वर्षासाठी 7 लाखाच्या आसपास निधी दिला जातो जर याच ठिकाणचा आकडा काढला तर जवळपास वार्षिक 56 लाख रुपये येतात. तालुक्यामध्ये अशी लागवड अनेक भागांमध्ये आहे यावर्षी करगणी येथे 11 हजार रोपे लावण्यात आली आहेत, खरसुंडी येथे 13 हजार 500, घरनिकी येथे 5500 अशी एकूण 39 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे, लागवड केलेल्या वृक्ष लागवडीसाठी साधारणपणे पावणे तीन कोटी शासकीय अनुदान येते.

त्यामुळे एकट्या आटपाडी तालुक्यांमध्ये काही करोडाच्या घरात निधी येतो मात्र हा निधी प्रत्यक्ष कामावरती किती खर्च होतो हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

त्यामुळे एका मिटकी बनपुरी, करगणी, घरनिकी येथील कामाची चौकशी करून चालणार नाही तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी झालेल्या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून भला मोठा पगार दिला जातो मात्र तरीसुद्धा शासनातील हे लोक शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या चांगल्या योजनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवत आहेत .अशा अधिकाऱ्यांची व विभागांची चौकशी होणे गरजेचे आहे .


जनतेने कष्ट करून कमावलेल्या पैशातून शासनाकडे कर भरलेला असतो, आणि याच करातून शासन विविध शासकीय योजनांवरती पैसा खर्च करत असते, मात्र हा पैसा शासनाकडून नेमून दिलेले अधिकारी चुकीच्या पद्धतीने खर्च दाखवत असतील तर अशा शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.


तरी वरील सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे ,तरी दोषी अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून कारवाई व्हावी अशीही मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.



लागवड केलेली रोपे

करगणी 11 हजार रोपे , खरसुंडी येथे 13 हजार 500, घरनिकी येथे 5500 अशी एकूण 39 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे,

मजुरांचे पैसेच दिले नाहित


वृक्ष लागवड करण्यासाठी खाजगी ठेकेदारामार्फत मजूर लावण्यात आले होते परंतु त्या मजुरांच्या कामाचा मोबदला अद्याप त्या मजुरांना मिळाला नाही तरी याचीही चौकशी करून ज्या मजुरांनी वृक्ष लागवड केली त्या मजुरांची मजुरी मजुरांना मिळावी अशी मागणी मजुरांच्या कडून होत आहे

Views: 324
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

उंबरगाव- दडसवाडी येथील शिवसेनेचे उपसरपंच सुनील गावढे सह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)