उंबरगाव- दडसवाडी येथील शिवसेनेचे उपसरपंच सुनील गावढे सह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील उंबरगाव, दडसवाडी येथील शिवसेनेचे उपसरपंच सुनिल गाढवे, खंडू बुधावले, मारुती बुधावले, दत्ता बुधावले, रत्नाकर गाढवे, विश्वास सावंत यांच्या सहकार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या आटपाडी तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान सुरू असतानाच अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीचे समिकरण बदलू शकते.असा जाणकारांचा अंदाज आहे.







