• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

विधवा वहिनीला तीन अपत्यासह दिराने स्वीकारले…नागेश्वर मंदिर परिसरात संपन्न झाला आदर्श विवाह

माणगंगा by माणगंगा
July 23, 2021
in सामाजिक
0
विधवा वहिनीला तीन अपत्यासह दिराने स्वीकारले…नागेश्वर मंदिर परिसरात संपन्न झाला आदर्श विवाह

विधवा वहिनीला तीन अपत्यासह दिराने स्वीकारले
नागेश्वर मंदिर परिसरात संपन्न झाला आदर्श विवाह


त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर भावाच्या निधनानंतर विधवा वहिनीशी लग्न करून अपंग तरुणाने आधार देऊन समाजापुढे आर्दश निर्माण केला आहे.विशेष म्हणजे विधवा वहिनीला तीन मुलांसह तरुणाने स्वीकारले आहे.


शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील संतोष भिला करंके यांचे सामान्य कुटुंब आहे.त्यांना पाच मुले आहेत.ऑगस्ट २०१६ मध्ये संतोष करंके यांच्या पत्नी चा मृत्यू झाला.त्यानंतर चार महिन्यात च त्यांचा चार नंबर चा मुलगा सुधाकर संतोष करंके याचे डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले. त्याचा मनिषा शी असणारा संसार अवघ्या नऊ वर्षांत तेथेच संपला.पती गेल्याने २५ वीशीत असणारी मनीषा विधवा झाली. विधवा मनीषा समोर दुःखाचा डोंगर होता.तीन मुलांचा सांभाळ करण्याचे भलेमोठे आव्हान मनीषा पुढे होते.


त्यातच पत्नी व मुलगा गेल्याने संतोष करंके पूर्णता खचले होते.करंके यांचे दुःख येथेच संपले नव्हते.सर्वात लहान मुलगा जितेंद्र हा दोन्ही पायांनी अपंग आहे.त्याने इंग्रजी विषयात एम.ए.बी.एड.चे शिक्षण केलेले आहे.तो शिरपूर येथे आर सी पटेल प्राथमिक शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून नोकरीला आहे.नोकरीला असल्याने त्याला लग्नाला मुलगी मिळेल अशी भोळ्या बापाला आशा होती.जितेंद्र च्या वयाची ३५ शी कधीच पार झाली होती.सध्या जितेंद्र हा ३८ वर्षांचा आहे.


जितेंद्र च्या लग्नासाठी काहींनी विधवा वहिनी मनीषा हिच्याशी लग्नाचा विषय ही काढला. मात्र तो गेल्या तीन वर्षांपासून तडीस जात नव्हता.जितेंद्र याला मनीषा ला स्वीकारत असतांना तीन मुलांची जबाबदारी कशी निभावता येईल याची चिंता होती.त्यामुळे लग्नाचा विषय पुढे सरकत नव्हता.


शेवटी भुपेशभाई पटेल हे समाजाच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तयार असतात. त्यांनी जितेंद्र ला प्रेरणा दिली. यात जितेंद्र चा भाऊ धनराज कंरके व वहिनी रत्नमाला कंरके यांनी मोठी भूमिका निभावली.मनीषा हिचे माहेर तालुक्यातील दहिवद येथीलच आहे.तिचे वडील अशोक दिनकर चव्हाण व किशोर विश्वास चव्हाण यांनीही या लग्नाला तात्काळ होकार दिला.शेवटी जितेंद्र व मनीषा ही या लग्नासाठी तयार झाले.


जितेंद्र व मनिषाचा विवाह पवित्र अशा नागेश्वराच्या मंदिरावर दिनांक २२ जुलै रोजी पार पडला.लग्नात सर्वात जास्त लक्ष सातत्याने जात होते ते त्या तीन चिमुकल्यांकडे. गेल्या साडेचार वर्षांपासून पोरके झालेल्या या तिन्ही मुलांना काकाच्या रुपात बापाचे छत्र मिळाले आहे. मनीषाच्या जीवनातही साडेचार वर्षांचा अंधार संपला आहे.आणि अपंग असणाऱ्या जितेंद्र ला मनीषा व तीन मुलांच्या रुपात भक्कम आधार मिळाला आहे.


जितेंद्र व मनीषा च्या या निर्णयाने समाजापुढे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या आदर्श पावलांची समाजाने निश्चितच दखल घेतली पाहिजे.परिवर्तनवादी समाजाची बीजेचे जणू जितेंद्र व मनीषाने पेरली आहेत.यातून अपंग जितेंद्र ला आधार मिळवून देणारी मनीषा व तीन मुलांसह मनीषासाठी छत्रछाया निर्माण करणारा जितेंद्र यापुढेही समाजात निर्माण व्हावेत याच अपेक्षांसह जितेंद्र व मनीषा ला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

   जितेंद्र याने वहिनी मनीषा सह चैताली (वय १२ वर्ष  ), लावण्या ( वय ५ वर्ष  ) व कमलेश ( वय ९ वर्ष  ) या तिन्ही मुलांना स्वीकारले आहे.या लग्न समारंभाला माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे,पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी,उत्तमराव माळी,तऱ्हाडी येथील माजी सरपंच ओंकार पाटील,कैलास भामरे,दहिवचे माजी सरपंच लक्ष्मीकांत पाटील,प्रल्हाद पाटील,मुख्याध्यापक सी.डी.पाटील,गणेश साळुंखे  हे उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल,आ.काशीराम पावरा,उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या वतीने आशीर्वाद दिलेत.

समाजात चांगले काम करण्याची प्रेरणा भुपेशभाई पटेल व पटेल परिवारांकडून मिळाली आहे.आणि मला या विवाहासाठी भाईंनीच प्रोत्साहन दिले.मोठा भाऊ धनराज व वहिनींनी तसेच मित्रा परिवाराने यासाठी खूप मदत केली.
जितेंद्र करंके,वर

गेल्या चार वर्षांपासून पती गेल्यापासून तीन मुलांचा सांभाळ करीत होती.मात्र एकटे जीवन कठीण असते.माझया दिराने मनाचा मोठेपणा करून स्वीकारले याचे मी भाग्य समजते.
मनीषा करंके,वधू

करंके कुटुंबाने, जितेंद्र व मनीषाने घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे.यातून समाजाने आदर्श घेतला पाहिजे.तालुक्यात कितीतरी कुटुंबाचे जीवन पटेल परिवाराने सुखकर केले आहे.यासाठीही पटेल परिवार नेहमी जितेंद्र व मनीषा च्या पाठीशी राहतील याची खात्री देतो.
प्रभाकरराव चव्हाण,माजी नगराध्यक्ष

Views: 1,287
Share

Related Posts

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

July 8, 2024
ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
Next Post
…कुठे लपला तथा कथित जाणता राजा… भाजप नेते जयवंत सरगर यांचा सवाल

…कुठे लपला तथा कथित जाणता राजा… भाजप नेते जयवंत सरगर यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)