आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी….चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीच्या स्वाधीन
आटपाडी पोलिसांची दमदार कामगिरी चोरीला गेलेला मुद्देमाल फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस ठाणे कडील गु. र.न. 261/22 कलम 392, 342 मधील फिर्यादी श्रीमती कोंडाबाई ज्ञानदेव कुंभार वय 90 रा. चिंचाळे यांना कोर्ट आदेशाने गुन्ह्यात चोरीतील गेलेला किंमती मुद्देमाल परत करण्यात आला त्यामध्ये 49 मण्यांची माळ व कर्णफुले होती तो मुद्देमाल परत करण्यात आली आहे.
तसेच गु. र. न. 334/ 22 मधील फिर्यादी नितीन कालिदास खरात रा. गुरसाळे ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर यांना कोर्ट आदेशाने गुन्ह्यात जप्त १३९.५ ग्रॅम बॉक्स चैन व 75 ग्रॅम चैन असा 9,23,596 /- किमतीचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे. मुद्देमाल परत करील असताना आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीकरी व कर्मचारी उपस्थित होते.







