कमेरी परिसरात जखमी अवस्थेत रानगवा,
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडले
कामेरी ता. वाळवा येथील पाचवा टप्पा या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात दिनांक 3/ 12 /2022 पासून एक रानगवा आढळून आला. सदर गव्याचे निरीक्षण केले असता त्याच्या हालचालीवरून जखमी असलेले दिसून आले.
सदर गव्याचा बचाव व उपचार करण्यास करता सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मागोवा घेत होते ,परंतु दाट ऊस असल्याने वस्तीलगत असणारा राष्ट्रीय महामार्ग यामुळे अनेक अडचणीवर मात करत स्थानिक ग्रामस्थ च्या सहकार्याने व राजारामबापू साखर कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने उपनिबंधक सांगली श्रीमती निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक वनीकरण सांगली डॉक्टर अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील ,डॉक्टर अंबादास माडकर, पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर वनरक्षक रायना पाटोळे, अमोल साठे, प्रकाश पाटील, हनुमंत पाटील, वनमजूर शहाजी पाटील, डॉक्टर संतोष वाळवेकर ,वन्यजीव प्रेमी सुशीलकुमार गायकवाड, अमित कुंभार यां,नी सदर गव्याच्या सुरक्षेचे साठी प्रयत्न केले
तसेच जखमी रानगव्यावर उपचार सुरू आहेत गावा सुरक्षित झाले वर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.







