महिलेचा विनयभंग एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
आटपाडी तालुक्यातील एका गावातील एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत पीडित महिलेने संदिपान लक्ष्मण जेडगे याच्या विरोधात तक्रार दिली आहे
सदर पीडित महिला व तिची सासू ही त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये ज्वारी खुरपत असताना संशयित आरोपी संदिपान जेडगे राहणार बोंबेवडी हा तेथे येऊन पीडित महिलेस तू फार आवडते मी तुझा स्टेटस ठेवला आहे तू माझ्याबरोबर चल असे म्हणून पीडित महिलेला मिठी मारून हात धरून साडी ओढून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून महिलेचा विनयभंग केला आहे ही घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस नाईक ठोंबरे करीत आहेत .







