नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे कुस्ती स्पर्धेतील यश
झरे ता.आटपाडी येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी,सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालयाचे सांगली विभागीय क्रीडा परिषद 2022 – 23च्या वतीने 8 व 9डिसेंबर 2022 रोजी एन. डी.पाटील नाईट कॉलेज सांगली येथे घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले.
बीए भाग – 1 मधील विद्यार्थी पै. मुजावर इम्रान आबुलाल याने याने खुल्या गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवला. बी.ए. भाग 2 मधील पै.मोरे मयूरसिंह तुळशीराम याने 97 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी कराड येथे होणाऱ्या इंटर झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आर. एस.चोपडे , व्हा.चेअरमन,श्रीमती एल. टी.शेंडगे,सचिव, एस. ए. पाटील,खजिनदार, एस. व्ही. अनुसे संस्थेतील जेष्ठ सल्लागार व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, आर. एच. पाटील व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एस. के.वाघमोडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा.के.आर. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल झरे पंचक्रोशीतून दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत आहे.







