आचारसंहिता भंगप्रकरणी बाळेवाडी मध्ये 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
बाळेवडी ता. आटपाडी येथील ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत.
बाळेवाडी गावची निवडणूक होत असताना सोमवारी बाळेवाडी येथे स्वामी सद्गुरू पॅनलच्या कार्यकर्त्यांनी धुळोबा मंदिर येथे आचारसंहितेचे पालन न करता,कोणतीही परवानगी न घेता प्रचाराचा शुभारंभ केला व पदयात्रा काढली होती, त्यामुळे आचारसंहिता भंग झाल्याने आचारसंहिता पथकाने संजय कोळेकर, मारुती यमगर, तुकाराम राजगे, जगन्नाथ कोळेकर, दिलीप कोळेकर यांच्यासह 50 ते 60 जणांच्या विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कोरवी करीत आहेत.






