लिंगीवरेतील नववधू लग्नाच्या बोवल्यावरून थेट मतमतदान केंद्रावर
आटपाडी प्रतिनिधी
लिंगीवरे ता आटपाडी येथील नववधू आपल्या डोईवर अक्षदा पडताच पुढील काही अवधीतच लोकशाहीने बहाल केलेला मताधिकार बजावण्यासाठी लग्न मंडपातून थेट मतदान केंद्रावर पोहोचली.
लिंगीवरे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आत्माराम भिवा खटके यांची कन्या प्रियांका आत्माराम खटके हिच्या लग्नकार्याची तिथी यापूर्वीच निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होऊन मतदानाची तारीख आयोगाने जाहीर केली. दोन्हीही कार्यक्रम एकाच दिवशी आले. ठरवलेल्या तिथीमध्ये कोणताही बदल करणे नियोजनाच्या दृष्टीने त्रासाचे होऊ लागले होते त्यामुळे ठरलेल्या तिथीप्रमाणे विवाह करण्याचे मुलीच्या व मुलाच्या पालकांनी ठरवले त्यानुसार त्यांचे लग्न नुकतंच संपन्न झाले.
परंतु ग्रामपंचायत निवडणुकी च्या मतदानाची तारीख व लग्नाची तारीख एकच असल्याने नवरी मुलीचे मतदान होणार की नाही यामध्ये ग्रामस्थांना उत्सुकता लागली होती
तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रियांका आत्माराम खटके या मतदार असलेल्या आजच्या नवरीचे मतदार यादीमध्ये नाव होते. लग्नकार्य असतानाही आपला मताधिकार बजावून लोकशाहीला बळकट करण्याचा निश्चय केलेल्या या नवरीने दुपारच्या मुहूर्तावर शुभमंगल कार्याचा विधी उरकून लगेचच दिघंचीतील मंगल कार्यालय मधून गावाकडे लिंगीवरे येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला. लग्न मंडपातील स्टेजवरून थेट मतदान केंद्रांमध्येच नवरी दाखल झाली.
अक्षदा पडल्यानंतर त्याच दिवशी बोहल्यावरून जाऊन मतदान करण्या च्या अशा क्वचितच घटना घडत असतात त्यामध्ये लिंगीवरे या गावी ही घटना घडल्याने मुलीने मतदानाचा हक्क लग्नाच्या दिवशी बजवला याबाबत सर्व तालुका वर चर्चा होत आहे व नवरी मुलीचे कौतुक होत आहे
फोटो _ वधू वर







