झरे ता. आटपाडी येथे अति वेगाने आलेल्या ट्रक टॅंकरने दोन दुचाकी ला व दोन महिलेंना धडक दिल्याने एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर दुसरी महिला जखमी होऊन उपचार घेत आहे व दुचाकीचा खिळखिळा झाला आहे.
झरेत ट्रकटँकरच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, तर दुसरी महिला जखमी,दोन दुचाकीचा चुरा,दोन दुचाकीचा चुराडा
झरे ता. आटपाडी येथे अति वेगाने आलेल्या ट्रक टॅंकरने दोन दुचाकी ला व दोन महिलेंना धडक दिल्याने एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर दुसरी महिला जखमी होऊन उपचार घेत आहे व दुचाकीचा खिळखिळा झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी झरे येथील बिरदेव कृषी केंद्रा समोर रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाजूला पारेकरवाडी चे मंगेश धोंडीराम दगडे हे दुचाकी लावून बिरदेव कृषी केंद्रामध्ये शेतीचे औषध आणण्यासाठी गेले होते. तर त्यांच्या शेजारी गुरुदत्त इलेक्ट्रिकल चे दुकान आहे. यांचे मालक सुरेश पवार हे पाली खंडोबाला जाण्यासाठी गाडी सप करत होते व त्यांची पत्नी राणी सुरेश पवार ह्या रस्त्यालगत येऊन थांबल्या होत्या. तर त्यांच्या शेजारी नारायण सकट यांचे वाघजाई बोरवेल चे दुकान आहे .
यामध्ये प्रकाश जयवंत पवार व संगीता प्रकाश पवार वय वर्ष 45 हे दोघे पती-पत्नी राहणार तरसवाडी ता. खटाव हे चहा घेऊन घरातून बाहेर आले व बाहेर रस्त्यालगत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाजूला टीव्हीएस लुना लावली होती
या टीव्हीएस लुनावरती बसण्यासाठी हे दोघी पती-पत्नी बाहेर आले होते. तोपर्यंत काही क्षणातच पश्चिमेकडून झरेच्या दिशेने अति वेगाने ट्रक टँकर आला. ट्रक टँकरच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानंतर पहिल्यांदा त्याने बिरदेव कृषी केंद्राच्या समोर असणारी दुचाकी एम एस 10 सीसी 30 77 हिरो होंडा ह्या गाडीला जोरात धक्का दिली या धडकेत ट्रक टँकरच्या मागच्या टायर खाली पूर्णपणे दबली आहे.
त्यानंतर लगेचच पुढे काही दहा ते वीस फुटाच्या अंतरावर राणी सुरेख पवार ह्या उभ्या होत्या त्यांनाही ट्रकने उडवले त्यामध्ये जखमी झाल्या आहेत. सध्या त्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. तर पुढे वाघजाई बोरवेलच्या समोर टीव्हीएस लुना एम एच 1011 -ca 38 58 या गाडीजवळ उभ्या होत्या त्यांनाही ट्रकने उडवले, पंधरा ते वीस फूट उंच हवेमध्ये त्या उडाल्या व पुन्हा जमिनीवरती कोसळल्या त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर ट्रक टँकरच्या पाठीमागे डाव्या साईडला सहा चाके तर उजव्या साईडला सहा चाके अशी होती त्यापैकी डाव्या साईडची दोन चाकाची जोडी ट्रकच्या जॉईड पासून निसटली व अति वेगाने जाऊन सचिन राजमाने यांच्या दुकानाच्या समोरील व ब्रह्मचैतन्य चहा सेंटरच्या पाठीमागील दगडी भिंतीला जोरात धडक दिली त्यामध्ये भिंत कोसळली, एवढ्या अति वेगाने टायर टँकर मधून सटकून गेले होते.
नशीब चौकामध्ये सका- सकाळी गर्दी नव्हती त्यामुळे त्या टायरमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
एवढे होऊन सुद्धा टँकर वाल्याने कोणताही विचार न करता टॅंकर अति वेगाने कराड पंढरपूर हायवेने शेनवडी ता. माण च्या दिशेने घेऊन गेले त्यानंतर गावातील तरुणांनी टू व्हीलर, फोर व्हीलर वर जाऊन टँकर चां पाठलाग करून पकडले व त्याला अढवले .त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे.
चौकट
कराड पंढरपूर महामार्ग आणखी किती जणांचे जीव घेणार आहे. याच महामार्गावर विभूतवाडी येथे सात ते आठ अपघात झाले त्यानंतर आता झरेत झालेला अपघात यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला व दुसरी महिला जखमी झाली आहे. म्हणजे ह्या महामार्गावरती सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देऊन गतिरोधक करणार आहे की नाही हा गंभीर प्रश्न आहे. जर सार्वजनिक बांधकाम गतिरोधक करणार नसेल तर अपघातात झालेल्या सर्व मृत्यूची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.







