ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे चाक
निखळले,जीवितहानी नाही
ही गोष्ट ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरने ट्रॅक्टर जाग्यावर थांबवला परंतु पंधरा ते वीस फूट डांबरी रस्ता ट्रॅक्टरने तोडत नेला आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरून येणारे किंवा पाठीमागून वरट्याक करून जाणारे कोणतेही वाहन नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मागील चार दिवसांमध्ये विभूतवाडीत ऊस वाहतूक करणारे ट्रॉली फुलावरती पलटी झाली होती तर काल झरे येथे टँकरची चाके निघून एका महिलेचा जीव घेतला ही घटना ताजी असतानाच आज झरे नजीकच विभूतवाडी येते ट्रॅक्टरचे चाक निसटले .
कराड पंढरपूर महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने झाल्याने वाहने सुसाट जातात विभूतवाडी किंवा झरे येथे कुठेही गतिरोधक नाही त्यामुळे वाहने सुसाट वेगाने जात आहेत तरी महामार्गावर गावानजीक रस्त्यावरती गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांत होत आहे.
वैशिष्ट्य म्हणजे त्या ट्रॅक्टरला किंवा ट्रॉलीला कोणताही नंबर नाही बिगर नंबरचा ट्रॅक्टर व बिगर नंबरची ट्रॉली आहेत.







