जिल्ह्यातील आश्रम शाळेत विविध स्पर्धा संपन्न …. आटपाडी तालुक्यातील जोगेश्वरी शिक्षण संस्था खरसुंडीच्या आश्रम शाळेचा समावेश
आटपाडी प्रतिनिधी
समाजकल्याण विभाग सांगली यांचे मार्फत जिल्ह्यातील आश्रम शाळा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
त्याबरोबरच सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांच्या आयोजनामुळे आश्रम शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना काळामध्ये शाळांना आलेली मरगळ दूर झाल्याची भावना विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दिसून आली.
सांगली जिल्ह्यामध्ये 42 आश्रम शाळा असून या आश्रम शाळांमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर व निरीक्षक सुनील करचे यांचे मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय स्पर्धांचा टप्पा पार पडल्या.
क्रीडास्पर्धा दरीबडची ,घोरपडी, सांडगेवाडी , शिराळा येथील आश्रम शाळेत पार पडल्या. तर वक्तृत्व व निबंध स्पर्धा विटा, आष्टा , इस्लामपूर व माडग्याळ येथे पार पडल्या . सांस्कृतिक स्पर्धा उमदी ,सांडगेवाडी ,विटा व इस्लामपूर या ठिकाणी संपन्न झाल्या .चित्रकला स्पर्धा जत, तासगाव, खरसुंडी, बेडग व जकाईवाडी या ठिकाणांच्या शाळांमध्ये संपन्न झाल्या . जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आष्टा येथे पार पडले.
स्पर्धांच्या आयोजनामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेलेचे बेडग येथील आश्रम शाळेचे संस्थाचालक अशोकराव ओमासे म्हणाले
दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धांचा टप्पा पार पडल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व शिक्षकामध्ये याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.







