आटपाडीतील शेतकऱ्यांची ब्लोअर घेऊन देतो म्हणून 4 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक
आटपाडी प्रतिनिधी
शेटफळे ता. आटपाडी येथील सोमनाथ नानासो मोरे यांना ब्लोअर यंत्र घेऊन देतो असे भागेश रामजी नांदवडेकर यांनी सांगितले होते. यामध्ये सोमनाथ मोरे यांची चार लाख पाच हजाराची फसवणूक झाल्याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की भागेश रामजी नांदवडेकर राहणार राजीव गांधी नगर साळुंखे गल्ली नवीन म्हसोबा मंदिर कळंबा कोल्हापूर मूळ राहणार गडहिंग्लज याने बोरस्ते कंपनी चा डीलर आहे .असे सांगून कृषी विभागाकडून मिळणारे ब्लोअर साठी लागणारे अनुदान यासाठी बीले देतो .असे सांगून सोमनाथ नानासो मोरे राहणार शेटफळे यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये घेऊन ब्लोअर दिलेच नाही.
कृषी विभागाकडून मिळणारे 1लाख 25 हजार रुपये अनुदान सोमनाथ मोरे यांना न मिळाल्याने त्यांनी 4 लाख 5 हजार रुपयाची फसवणूक केली असल्याबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंद केली आहे .पुढील तपास पो.हे .कॉ. महेश आवळे करीत आहेत







