नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा संपन्न…
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. ता.आटपाडी, जि.सांगली. या महाविद्यालयामध्ये मराठी भाषासंवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘अक्षरसुगी’ या भित्तीपत्रकाचे उदघाटन ग्रामीण कथाकार श्री रमेश जावीर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यामधील एक उपक्रम म्हणजे लेखक-विद्यार्थी मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी खरसुंडीचे ग्रामीण कथाकार आणि काष्ट शिल्पकार, रमेश जावीर उपस्थित होते. यावेळी त्यांनी कथा कशी लिहावी.याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थी ही अगदी मनमोकळे बोलत होते. कथा निर्मितीच्या संदर्भाने बोलताना जावीर म्हणाले की, कथेचा नायक उभा करत असताना त्याला अगदी शेवट पर्यंत अडचणी दाखवा…..
पण शेवट मात्र त्याचा विजय दाखवा. आणि खलनायकाला शिक्षा दिल्याचे दाखवा. त्याच पद्धतीने रोजच्या रोज विविध घटनांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. पुढे त्याचा आपल्याला कथा निर्मितीच्या संदर्भाने फायद्याचे ठरेल. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा.खांडेकर सरांनी एक छोटीशी विनोदी कविता सादर करून विद्यार्थ्यांना खळखळून हसवल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विठ्ठल खिलारी यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा.सौ. रेश्मा काळेल यांनी तर आभार प्रा.समीर मुलाणी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.एन. डी.पाटील, प्रा.एम.एस.शिंगाडे, प्रा.सौ.माया माने, प्रा आर. एच. पाटील प्रा.देवेंद्र देवकुळे, श्री.जे.जे.फकीर, श्री एम.पी.नरळे उपस्थित होते.







