भूगोल दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन
आटपाडी प्रतिनिधी
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय,झरे.येथे भूगोल दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते.
भूगोलशास्त्र विभागामार्फत भूगोल दिनानिमित्त भूगोलशास्त्रातील करिअर च्या संधी या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये भूगोल विभाग, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक प्रा. डॉ.रमेश गावीत यांनी भूगोलशास्त्र विषयातील वेगवेगळ्या नोकरीच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील आर.एच. होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा.पाटील एन.डी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.काळेल आर.व्ही. यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.खांडेकर एम.डी.यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी , विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







