आटपाडी तालुक्यात 467.50 हेक्टर राखीव वने घोषित
60 महसूल गावात 4 हजार 361.38 हेक्टर वनक्षेत्र
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये 60 महसूल गावामध्ये 4361.38 हेक्टर वनक्षेत्र असून त्यापैकी राखीव वनक्षेत्र 467.50 हेक्टर जाहीर करण्यात आले आहे. अनिर्णीत आरक्षित क्षेत्र 3893.88 हेक्टर आहे.
तर आटपाडी तालुक्यातील राखीव वने म्हणून तळेवाडी ,करगणी ,लेंगरेवाडी ,वलवण, घानंदा येथील 467.50 हेक्टर क्षेत्र जाहीर केले आहे. .
ज्या ठिकाणी राखीव वने जाहीर केले आहे. त्या ठिकाणी त्या राखीव वनेत जाण्यास बंदी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये राखीव होणे जिथे जिथे आहेत तिथे तिथे नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. कारण जिथे राखीव वने जाहीर केलेली आहेत. त्या ठिकाणी कोणताही मनुष्यप्राणी गेला असता त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते.
वन विभागाच्या परवानगीशिवाय कोणीही त्या परिसरामध्ये प्रवेश करायचा नसतो. आणि चुकूनही एखाद्या व्यक्तीने प्रवेश केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते.
तालुक्यामध्ये आंबेवाडी, आटपाडी, आवटेवाडी, आवळाई, बाळेवाडी, बनपुरी, भिंगेवाडी ,बोंबेवाडी, चिंचाळे, देशमुखवाडी, धावडवाडी, दिघंची ,गळवेवाडी, घानंद, घरनिकी, गोमेवाडी, गुळेवाडी, हिवतड, जांभुळणी, काळेवाडी, कामत ,कानकात्रेवाडी, करगणी, कौठळी, खानजोडवाडी, खरसुंडी, कुरुंदवाडी, लेंगरेवाडी, लींगीवरे,माळेवाडी, मानेवाडी, मापटेमळा, मासाळवाडी ,मिटकी, घुळेवाडी, नेलकरंजी, निंबवडे, पडळकरवाडी, पळसखेल, पांढरेवाडी, पारेकरवाडी, पात्रेवाडी, पिंपरी बुद्रुक, पिंपरी खुर्द, पिसेवाडी, पु जारवाडी(दी) ,पुजारवाडी, राजेवाडी, शेरेवाडी, शेटफळे, तळेवाडी,तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्लापूर, गोमेवाडी, वलवन, यमाजी पाटलाचीवाडी, झरे या 60 महसूल गावामध्ये वनक्षेत्र असलेली गावे 26 आहेत .
वनक्षेत्र असलेल्या पुढील गावांचा समावेश होत आहे. यामध्ये आटपाडी, मुढेवाडी, पुजारवाडी (दि.) तडवळे ,शेटफळे ,तळेवाडी, गोमेवाडी, हिवताड ,बाळेवाडी ,करगणी, लेंगरेवाडी, कामत, मिटकी, घरणीकी, खरसुंडी, चिंचाळे ,आवटेवाडी ,नेलकरंजी वलवण ,पारेकरवाडी, झरे , जांभुळनी, पिंपरी बुद्रुक, घानंद,विभूतवाडी व कुरुंदवाडी या 26 गावाचा समावेश व नक्षत्रामध्ये होत आहेया 26 गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी कार्यरत आहेत.
सध्या वन विभागामध्ये महिला वनरक्षक- तीन , वनपाल -एक पुरुष, वनरक्षक -एक पुरुष, वनपाल -एक पुरुष, वनमजूर -सात, वनक्षेत्रपाल -एक असा एकूण 14 जणांचा स्टाप आहे. तर कार्यालयामध्ये लिपिक नसल्याने कार्यालयीन कामकाजासाठी विलंब लागत आहे .तरी येथील लिपिक पद उपलब्ध करून ते त्वरित भरावे अशी मागणी होत आहे.







