• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी चा माझा मातंग बांधव, १९१५- १६ पासून आटपाडी ला वास्तव करून राहत असून ,तो गर्द अंधाऱ्या, काळोख्यातुन बाहेर येण्यासाठी धडपड, संघर्ष करीत आहे ! विलास खरात

माणगंगा by माणगंगा
January 27, 2023
in सांगली
0
आटपाडी चा माझा मातंग बांधव, १९१५- १६ पासून आटपाडी ला वास्तव करून राहत असून ,तो गर्द अंधाऱ्या, काळोख्यातुन बाहेर येण्यासाठी धडपड, संघर्ष करीत आहे ! विलास खरात

आटपाडी चा माझा मातंग बांधव, १९१५- १६ पासून आटपाडी ला वास्तव करून राहत असून ,तो गर्द अंधाऱ्या, काळोख्यातुन बाहेर येण्यासाठी धडपड, संघर्ष करीत आहे!

विलास खरात

आटपाडी ;

आटपाडी मध्ये मातंग समाज्याचे वास्तव्य साधारण सन १९१५-१६ च्या पूर्वीपासून आहे. मातंग समाज अस्पृश्य वर्गात येत असलेमुळे गांव कुसा बाहेरील पूर्व श्रमीच्या महार समाज्याच्या वस्ती लगत दक्षिण बाजूस मातंग समाज्याची तेरा-चौदा घराची वस्ती होती. सदर वस्तीमध्ये 1) दादू आबा मांग 2) नाना विठोबा मांग 3) रामा सावळा मांग 4) गोपा संभू मांग 5) कृष्णा व येसू मांग 6) खेत्री आंगना मांग 7) गेना बाबाजी मांग 8) दशरथ ज्ञानू मांग 9) कृष्णा तुका मांग 10) साधू मांग 11) श्रावणा तुका मांग 12)माधवा मांग 13) येदू सखाराम मांग 14) मारूती मांग या लोकांच्या घरांच्या वस्तीस मांग वाडा असे संबोधण्यात येत असे.


औंध संस्थान कालीन आटपाडी येथे मातंग समाज्याचे लोक हे अत्यंत गरीब व दैयनीय अवस्थेत राहात असलेमुळे सर्वांची घरे मातीच्या भेंड्यापासून कुडाच्या भिंती उभारून लाकडी वासे उभे आडवे लावून गव्हाच्या काडा पासून छप्पराची घरे शेकरुन राहत असत. त्यांचा झोपण्याचा बिछाना, वाकळा , गोणपाट , लक्तरे असत. पिण्याच्या पाण्यासाठी गाडगी व खापराच्या घागरी असत व पाणी साठविणेसाठी मातीचा रांजण असे. कुंभारापासून आणलेल्या भाजीव मातीच्या भांड्यात जेवत असत. कुणब्या कडून बैत्यापोटी मिळालेले धान्य तसेच भाकरीचे वाळलेले तुकडे, कळणा कोडयापासून बनविलेल्या भाकरी , मिर्च्याचा खर्डा, माडग तसेच पात्रची , तरोटा , हरणनिलीची भाज्या, गाजरे, रताळे खाऊन उदरनिर्वाह करीत असत. पुरुषाचा अंगावर घालायचे वस्त्र म्हणजे लगोटा किंवा गुडग्यापर्यतचे फाटके धोतर, अंगात सदरा नसायचा. स्त्रियांना कधी काळी सणासुदीस घेतलेल्या लुगड्यास अनेक ठिकाणी दंड (हाताने शिवून) घालून जुनेच लुगडे वापरीत असत.लहान मुलांच्या कपड्याचा शक्यतो विषयच येत नसे. मातंग समाज विदारक अवस्थेत जीवंत राहणेसाठी जगत होते.


आटपाडी येथील अस्पृश्य मातंग समाज गावगाड्यातील अविभाज्य घटक असलेमुळे कृषी पुरक व्यवसाय करीत असत. मातंग समाज्याचा मुख्य धंदा केकताडाच्या वाकापासून व तयार केलेल्या वाकापासून नाडा , सोंदूर ,दोर ,चऱ्हाट , काडण्या, जनावराच्या मुसक्या, ,गोफण,कासरे, शिके इत्यादी बनवित असत,त्याच बरोबर सिंधीच्या झाडाचे फडे कापून त्या फडापासून केरसुनी तयार करीत असत. शेतकरी शेताच्या पिकाचे स्वंरक्षणासाठी ज्या जमीनी ओढ्याच्या , वगळीच्या बाजूच्या असतील त्या जमिनीच्या बांधावर केकताडची , घायपाताची बेटे लावीत असत. त्यामुळे जनावरापासून शेताच्या पिकाचे स्वंरक्षण होत असे. त्यामुळे मातंग समाज्यातील लोक शेतकऱ्याची परवानगी घेऊन केकताड किंवा घायपात कापून आणून ते आटपाडीच्या कैकाडी डोहात किंवा शुक्र ओढ्यातील पाण्याच्या डबक्यात सात ते आठ दिवस केकताड पाण्यात भिजू घालत असत. त्यानंतर ते शुक्र ओढ्याच्या वाळूवरती उन्हात वाळत घालत असत. केकताड वाळलेनंतर त्याचे वाक बनवित असत ते वाक घरी आणून फिरकीमध्ये पिळ देवून वाकाचे चऱ्हाटापासून दोरखंड बनवित असत. व शेतकऱ्यांना बैत्यापोटी देत असलेमुळे सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांकडून धान्य घेऊन येत असत व त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत. त्यामुळे जीवन चरित्र चालविणेचा व्यवसाय झालेला होता.


साधारण सन १९२५-२६ व सन 1929- 30 च्या दरम्यान आटपाडीच्या शुक्र ओढ्यास पावसाळ्यात दोन्ही वेळा मोठे पूर आलेले होते ,परंतु सन १९२९-३० चा पूर हा सर्वात मोठा पुर होता.पुराच्या पाण्याने गावास वेडा घातलेला होता.सदरचे पाणी मांगवाड्यात घुसल्यामुळे व मांग वाड्या शेजारून वाहणाऱ्या खवणीचे वगळीतून येणारे पाणी तुंबल्यामुळे मातंग समाजातीची सर्व घरे पाण्याखाली गेली होती. या पुराच्या पाण्यामुळे मातंग समाजातील लोकांच्या कुडाच्या घराचे अतोनात नुकसान झाले होते घरातील मातीची भांडी, मडकी, गाडगी,वाक , गोणपाटे, लक्तरे , दोरखंड, नाडे, केरसुणी इत्यादी घरातील सर्व सामान पुरात वाहून गेलेमुळे मातंग समाजाची भयानक अवस्था झाली होती. फक्त अंगावरचे कपडे राहिलेले होते, उघड्या डोळ्यांनी घरादाराचे नुकसान झालेले पाहिले होते, त्याही अवस्थेत जगण्यासाठी धडपड चाललेली होती.


औंध संस्थानचे वरिष्ठ गाव कामगार कुलकर्णी- पाटील यांनी शुक्र ओढ्याच्या पुराच्या पाण्यात मातंग समाज्याची वाताहत झालेली पाहिली असलेमुळे तसा रिपोर्ट औंध संस्थानात पाठविला होता. दर पाच-सात वर्षांनी आटपाडीच्या ओढ्यास पूर येत असत. औंधचे राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी हे महात्मा गांधीचे अनुयायी असलेमुळे त्यांच्या विचारांनीच कारभार करीत असत. त्यामुळे औंध संस्थानात सामाजिक सुधारणेवर प्रामुख्याने भर असलेमुळे मानव कल्याणाचे सूत्र राबवीत असत. त्याचाच भाग म्हणून आटपाडीचे डबई कुरण राखणेसाठी व संस्थानचे टपाल घेऊन येणे जाणेसाठी उंट ठेवले होते. ते उंट आलेनंतर डबई कुरणात चारा चारणेसाठी घेऊन जाणे, या कामासाठी मातंग समाज्यातील शिवाजी दादु मांग यांची नियुक्ती केली होती. शिवाजी दादू मांग हे डबई कुरण राखत असलेमुळे त्यांना शिवाजी कुरणे या नांवानेच त्यांना सर्वजन बोलावीत असत. कुरण राखत असलेमुळे त्यांना कुरणे ही उपाधी लावणेत आली होती.


औंध चे राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी हे आटपाडी येथे आलेनंतर शुक्र ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मातंग समाज्याची वाताहत झालेली शिवाजी मांग (कुरणे) यांनी पहिलेले असलेमुळे त्यांनी गांवचे कुलकर्णी – पाटील यांच्या माध्यमातून आपल्या मातंग समाज्यातील लोकांना घेऊन औंधच्या राजांना समक्ष भेटून पुराच्या पाण्याने झालेली मांगवाड्याची वास्तवता मांडून निवाऱ्यासाठी आम्हाला दुसरीकडे जागा देणेत यावी याबाबत विनंती केली होती व सर्व मांग बांधवांनी औंधच्या राजेना दंडवत घालून राहायला दुसरी जागा द्या, अशी विनंती केलेमुळे व शिवाजी कुरणे बोलतो ते खरे आहे असे सांगितल्यामुळे औंधच्या राजेनी गावचे कुलकर्णी- पाटील व इतर मान्यवर मंडळीशी विचार विनिमय करून आटपाडीच्या माळा वरील जुना सर्वे नंबर १३९१ पै. मधील पाच एकर जमीन मातंग समाज्यासाठी देणेचे जाहीर केले व मातंग समाज्याची पुर्नरस्थापना आटपाडीच्या माळ रानावर केल्यामुळे मातंग कुटुंबाची निवाऱ्याची सोय झालेमुळे माळा वरील मोकळ्या जागेत झोपडी वजा खोपटी घालून राहू लागली, व आपला दोरखंडाचा व्यवसाय पुन्हा करू लागले.


औंध संस्थांनचे राजे श्री भवानराव पंतप्रतिनिधी यांनी आपल्या संस्थानचा कारभार समाजहिताचा व न्यायपूर्वक करीत असत. प्रगल्भ विचाराने न्याय व्यवस्था चालवून समाज सुधारणा करीत असलेमुळे या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी लोकल शाळा व गुराखी शाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे आटपाडीत शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. संस्थाने आटपाडी गांवात सन १९३७ साली गावच्या विकासासाठी म्युनिसिपल कार्यालयाची स्थापना केली होती. प्रत्येक घराचा सिटी सर्व्हे करून रस्ते, बोळे यांचा गाव नकाशा बनविणेत आलेला होता. आटपाडीच्या बाजार पटांगणात रस्तुमराव (बापू ) देशमुख व अमीनुउद्दीन कुरेशी यांनी सावलीसाठी चिंचेची व पिंपळाची झाडे लावली होती. पिण्याचे पाण्याचे आड (विहीर) पाडले होते. सूर्योपासना मंदिराची स्थापना केली होती, स्वतंत्रपूर वसाहत, डबई कुरणात फॉरेस्ट उभे केले होते. समाज हितासाठी अनेक योजना राबविण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये मातंग समाज्याने कामगार म्हणून योगदान दिले होते.


मातंग समाज्यातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असणारे समाज्याचे आधार स्तंभ मार्गदर्शक व समाज्याला योग्य दिशा देणारे जगु खेत्री मांग यांचा जन्म आटपाडी येथे दिनांक ०७/०९/१९२० रोजी झालेला आहे. त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झालेले होते. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले आहे. समाज्यातील तरुण मुलांना नोकरीसाठी योग्य ते मार्गदर्शन पदरमोड करून करीत असत. तसेच नामदेव तुका मांग यांचे सुद्धा शिक्षण सातवी पर्यंत झालेले होते. त्यांनी सुद्धा शिक्षकाची नोकरी केलेली आहे. ते नामा मास्तर या नावाने प्रसिद्ध होते. ते लोकांचे भविष्य सांगत असत. तसेच रण हालगी वाजविणेत पटाईत होते, हालगीचा शेडा मारले नंतर मांग वाड्यात आवाज घुमायचा, हालगी वाजविणेचे कसब व कौशल्य असले मुळे मातंगाच्या तरुण मुलांनी लेझीम पथक नावारूपाला आणलेले होते. जगन्नाथ व शिरप्पा हे सुद्धा शास्त्रीय पद्धतीने हालगी वाजवित असत. नामा मास्तर यांनी शिखर शिंगणापूर येथे सलग तीन वर्षे हालगी वाजून मानाचा फेटा, सव्वा पाच रुपये बक्षीस व नारळ पान सुपारी घेऊन येत असत.


सन १९३१ -३२ साली भारतातील ब्रिटिशाच्या मिलिटरी मध्ये दशरथ रानू मांग यांनी दोन मुले तातोबा व दामू हे मिलिटरी मध्ये भरती झालेले होते. मातंग समाज्यात दांडपट्टा चालविणेचे प्रशिक्षण दाजी येसू लांडगे शिकवीत असत, लाठीकाठी चालविणेचे शिक्षण अंबादास निवृत्ती लांडगे शिकवीत असत. मातंग समाज्यातील काही लोकांना तमाशाचा नाद असलेमुळे नाझरे येथील संभू गोपाळा मांग यांच्या तमाशात आटपाडी येथील महादेव विठोबा मांग , रामा सावळा मांग , साधू मांग, मारुती मांग इत्यादी लोकांनी तमाशा कलावंत म्हणून काम केलेले आहे. तसेच डबई कुरणात मस्टर कारकून म्हणून केराप्पा नामदेव लांडगे यांनी काम केलेले आहे. संस्थान कालीन रस्ते तयार होत असताना त्यांची नियुक्ती केली होती.


सिंग वाजविणाऱ्याना शिंगाडे म्हणत असत. शिंग हे अर्ध वर्तुळ पितळेच्या धातू पासून सुबकपणे बनवण्यात येत असे. सिंग हे समारंभाच्या कार्यक्रमास, लग्नकार्यात अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी, गाव मिरवणूक, वरात, कुस्ती आखाडा इत्यादी ठिकाणी मातंग समाज्यातील बाबू मल्हारी लांडगे, शंकर हरिबा लांडगे, मारुती लांडगे (सरदार), झाबु लांडगे हे सिंग वाजवण्याचे अप्रतिम काम करीत असत . सिंग वाजवणेची अवघड कला आहे त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.


आटपाडी येथील मातंग समाज्याने डबई कुरणातून लिंबाची मोठी झाडे आणून ती कापून त्यामधून खांब, किलचन इत्यादी काडून माळावरील मोकळ्या जागेमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधून त्या ठिकाणी भजन- किर्तन करणे, समाज एकत्र येऊन भंडारा घालणे, पंढरीच्या वारीस जाणे, विठ्ठल रुक्मिणीचे नाम जप करणे, धार्मिक वृत्तीने मंगलमय कार्य करणे इत्यादी समाजकार्य करीत असत. त्यामुळे सदरचा समाज संस्थानात विश्वासू व कष्टाळू गणला जात होता. आटपाडीच्या मातंग समाज्याची संस्थान काळातील पोलीस रेकॉर्डर कुठेही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आढळून येत नाही. विश्वास पात्र अशीच संज्ञा देण्यात आली आहे.


आटपाडी येथे मातंग समाज्याने एकत्र येऊन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महान साहित्यिक व विचारवंताचा आटपाडी पोलीस स्टेशन चौकात पुतळा उभा केला आहे. सदर ठिकाणच्या जागेस “ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ” असे नामकरण केले आहे. त्यामुळे समाज बांधव सामाजिक कार्यासाठी पुतळ्या जवळ एकत्र येत असतात, विचाराच्या प्रेरणेतून व संघर्षातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा केलेला आहे.


आटपाडी येथील मातंग समाज्यामध्ये सध्या सुशिक्षित वर्ग बऱ्यापैकी निर्माण झाला आहे. त्यामध्ये डॉक्टर, शिक्षक, नोकरीदार, पोलीस, भारतीय सैन्य दल, पशुवैद्यकीय सेवा, बँक अधिकारी इत्यादी ठिकाणी अल्प प्रमाणात आहेत, अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले आहेत. स्वतंत्र धंदा करू लागले आहेत काही तरुण रंगकाम करीत आहेत , काही मोल मजुरी करून जगत आहेत. समाज्याचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणेसाठी मातंग समाज्याला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. सामाजिक मागासलेपण गरिबी , बेरोजगारी, शिक्षणाचा दर्जा या बाबी सुधारणेसाठी मातंग समाज आर्थिक पायावर मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आजही माझा मातंग बांधव गर्द अंधाऱ्या काळोखातून बाहेर येण्यासाठी धडपड, संघर्ष करीत आहे.

 विलास खरात

आटपाडी , फोन नंबर ९२८४०७३२७७

Views: 342
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
वनविभागच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण  व विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषन वादळी चर्चे नेआंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोग यांचे सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले

वनविभागच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रजासत्ताक दिनी उपोषण व विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचे उपोषन वादळी चर्चे नेआंतरराष्ट्रीय मानव अधिकार सामाजिक न्याय आयोग यांचे सांगण्यावरून अखेर उपोषण सोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)