कुरुंदवाडीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला
सोन्याच्या अंगठी सह 44 हजार रुपयेचे साहित्य लंपास
आटपाडी प्रतिनिधी
कुरुंदवाडी ता. आटपाडी येथील जोतीराम वगरे यांच्या जायनाई किराणा, जनरल स्टोअर्स दुकानाच्या पाठीमागच्या बाजूचा पत्रा कात्रीने कापून जवळपास सोन्याच्या अंगठीसह 44 हजार रुपये चा माल चोरट्यांनी रातोरात लंपास केला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शनी सविस्तर माहिती अशी की कराड पंढरपूर महामार्ग नजीक कुरुंदवाडी फाटा येथे जोतीराम वगरे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. काल रात्रीच्या वेळेला कोणीतरी चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत मध्ये प्रवेश करून साहित्याची चोरी केली आहे.सकाळी सातच्या दरम्याने जोतीराम वगरे यांच्या पत्नी दुकान उघडण्यासाठी आल्या असता दुकानांमध्ये चोरी झाल्याची निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी पती जोतीराम वगरे यांना फोन केला. तोपर्यंत गावातील ग्रामस्थ जमू लागले त्यानंतर जोतीराम वगरे यांचे बंधू तातोबा वागरे यांनी पोलिसांना फोन करून चोरी झालेली माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याची पाहणी केली व पंचनामा केला आहे
यामध्ये गोडेतेल 2 बॉक्स 3 हजार रुपये,तेलाचे 2 डबे 4 हजार रुपये, खारीक व खोबरे 2 हजार रुपये, साबण बॉक्स 2– 1200 रुपये, संतूर साबण बॉक्स 2 हजार रुपये व इतर किरकोळ साहित्य 7 हजार रुपये सोन्याची चार ग्रॅम ची अंगठी, 20 हजार रुपये, कोल्ड्रिंक दोन बॉक्स 700 रुपये असा एकूण 44 हजार रुपयांचे साहित्य चोरट्याने रातोरात लांबवला आहे.






