• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माणदेशातील,माझा,नंदीबैलवाले, गावाच्या बाहेर राहणारा, भटका, असणारा ,समाज भारतरत्न, डॉ,बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्यचा उपभोग घेऊन आटपाडीच्या माणमातीच्या संस्कृतीत आनंदाने जीवन जगत आहे ! विलास खरात

माणगंगा by माणगंगा
February 1, 2023
in सांगली
0
माणदेशातील,माझा,नंदीबैलवाले, गावाच्या बाहेर राहणारा, भटका, असणारा ,समाज भारतरत्न, डॉ,बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्यचा उपभोग घेऊन आटपाडीच्या माणमातीच्या संस्कृतीत आनंदाने जीवन जगत आहे ! विलास खरात

माणदेशातील,माझा,नंदीबैलवाले, गावाच्या बाहेर राहणारा, भटका, असणारा ,समाज भारतरत्न, डॉ,बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्यचा उपभोग घेऊन आटपाडीच्या माणमातीच्या संस्कृतीत आनंदाने जीवन जगत आहे !

विलास खरात!

   आटपाडी  ;

माणदेशातील आटपाडी या भागात सुगीच्या हंगामात फिरस्ते भटके वर्गातील लोक येत असत. त्यामध्ये बेलदार, कैकाडी,वंजारी,लमाण, घिसाडी, वैदू, गोड, कोल्हाटी, दरवेशी, गारोडी, माकडवाले, वंजारी, बहुरूपी, रायरंद, फासेपारधी, आराधी, वाघे मुरळ्या, कुडमुडे जोशी,पोतराज,नाथपंथी,गोसावी,बैरागी व नंदीवाले असे अनेक वर्गातील फिरस्ते, भटके समाज्यातील लोक गांवात येवून आपल्या जवळील सामान,माल लोकांना विकून चार पैसे मिळवित असत.त्याचप्रमाणे भटक्यातील काही वर्ग गांवातील लोकांचे मनोरंजन करून येणाऱ्या भिक्षेतून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत असत.येणारे भटके जमातीतील लोक गांवापासून दोन मैलावर पाले टाकून राहत असत. त्यासाठी गांवच्या पोलिस पाटलाची परवानगी घ्यावी लागत असे. जास्त दिवस गांवात राहता येत नसे.त्यामुळे गावंच्या कुणब्यांना व इतरांना वस्तू,सामान,माल देवून,मनोरंजन करून त्यांच्यापासून धान्य व चार पैसे घेत असत.

शक्यतो त्यांना धान्यच मिळत असे. शेतकरी गावगाड्याच्या व्यवहारातील महत्वाचा भाग असलेमुळे धान्याच्या बाबतीत सर्वजन शेतकऱ्यावर अवलंबून असत.
आटपाडी येथे आलेले भटक्या जमाती पैकी नंदीबैल वाले समाज गेले अनेक वर्षापासून येत असलेमुळे त्यांच्या बाबत अनेक महत्वपूर्ण बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.सदरचे फिरस्ते भटकी जमातीचे असणारे नंदीबैल वाले हे मुळचे आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी जिल्हातील “रेणूगुंठा” या गांवातील असलेचे सांगतात. त्यांचा इतिहास पाहता असे दिसून येते की, सदरची जमात यांना नंदीबैल वाले उर्फ तिरमल असे म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यात वैशिष्टपुर्ण जमात म्हणून गणना होते.नंदीबैल वाले यांना आंध्रप्रदेशात “ गंगेड्ड् ” असे ही संबोधले जाते. तिरुपती बालाजीचे निस्सीम भक्त असलेमुळे त्यांना तिरमल या नांवाने सुद्धा ओळखले जाते.नंदीबैल वाले यांचे मुख्य दैवत तिरुपती बालाजी असले तरी सुद्धा नंदीवाले हे भगवान शंकराचे सुद्धा शिवभक्त आहेत.असे ते आवुर्जुन सांगतात.


पुर्वीच्या काळी बापू अंबाजी पवार व कृष्णा लक्ष्मण पवार हे गांवोगांवी भटकंती करत करत सातारा जिल्हातील खटाव तालुक्यातील कलेढोण या गांवात आले होते. गांवच्या कारभाऱ्याची परवानगी घेवून गांवापासून दोन मैलावर आपले पाले रोऊन आपल्या कुटुंबासह राहू लागले.

थोड्या दिवसानंतर बापू अंबाजी पवार यांनी कलेढोण सोडून आटपाडी या भागाकडे चालत वाटचाल सुरु केली. आपली पत्नी रक्कमाबाई बरोबर भटकंती सुरु ठेवली. आटपाडी भागातील निंबवडे,दिघंची, लिंगीवरे, पुजारवाडी, करगणी, गोमेवाडी, खरसुंडी, घाणंद,पिंपरी खुर्द, मानेवाडी, झरे,य.पा.वाडी येथील न्हावी मळा येथे भटकंतीचे वास्तव्य करून काही दिवसांनी मापटेमळा येथे गणपती सातारकर यांची परवानगी घेऊन मापटेमळ्याच्या माळ रानावर कापडी पाल टाकून राहू लागले. बापू व रखमाबाई यांना पाच मुले व तीन मुली झाल्या होत्या. मुले १) आण्णा २) रामा ३) लक्ष्मण ४) बाबू ५) काशिनाथ मुली- १) सोनाबाई २) शांताबाई ३) काशीबाई अशी अपत्ये झालेली होती.


बापू अंबाजी पवार यांचे बरोबर एक नंदीबैल, गाई, खोंड, घोडा, म्हैस,शेळी, कोंबड्या, कुत्रे असा लावा जामा सोबत होता. मापटे मळा येथे राहून आटपाडी व आसपासची खेडी गांवे ठरवून सदर ठिकाणी नंदीबैलास शिकवून गावोगांवी नंदीबैलास गावात घेऊन जाऊन फिरवत असत. नंदीबैलामार्फत भविष्य सांगत असत. गांवात गेलेनंतर बापूची पत्नी रक्कमाबाई गळ्यात अडकविलेल्या गाबुगळी (डोहलग) वाद्याने गुबू गुबू वाजवून गांवात नंदीबैल आलेचे आवाजाने कळत असत. त्यामुळे गाव गाड्यातून महिला नंदीबैलाची पूजा हळदी -कुंकू लावून भक्तीभावाने करीत असत.

त्यावेळी पाऊस पडेल काय, धन धान्य,मुबलक प्रमाण येऊ दे असे “नंदीबैलास” विचारता बापू नंदीबैलाच्या अंगावरून हात फिरविता नंदीबैल शिंगासह मान हलवित असत. त्यावेळी गळ्यातील बारीक घंटा वाजत असत. नंदीस अशा प्रकारे अनेक प्रश्न विचारत असत. त्यावेळी नंदीबैल मान डोलावित असत. त्यामुळे दारात नंदीबैल आलेमुळे महिला वर्ग समाधानाने सुपामध्ये धान्य घेऊन येत. व सुपात एक रुपया ठेवीत असत.व रक्कमाबाईच्या झोळीत धान्य वाढत असत. त्याच बरोबर घरातील भाकरी, शिळेपाके अन्न सुद्धा दुसऱ्या झोळीत वाढत असत. नंदीबैलास घरी घेऊन आलेवर धान्य गोणपाटाच्या बारदान्यात बांधून ठेवीत असत. व त्या धान्याचा वापर पावसाळ्यात करीत असत. गावातून मागून आणलेल्या शिळ्या , वाळलेल्या भाकरी तीन दगडाच्या चुलीवर शिजवून उकडून कुटुंबातील सर्वजन खात असत. व जीवन चरितार्थ चालवीत असत.


बापू अंबाजी पवार यांचा नंदीबैल धिप्पाड स्वरूपाचा होता. नंदीचे मोठे पसरट शिंगे होते. शिंगास रंगीबेरंगी लाल पिवळे फडके बांधत असत. नंदीच्या अंगावर दिमाखदार झूल घालत. गळ्यात घुंगराचे पट्टे,पायात घुंगराचे चाळ, नंदीच्या कपाळास बाशिंग बांधत असत. त्यामुळे नंदीबैलाचा वेगळाच रुबाब दिसत असे. त्यामुळे गावकरी लोक नंदिबैलास अदुभूत पद्धतीने पाहात असत. नंदीबैलामुळे गावातील लोक धान्य ,भिक्षा देत असलेमुळे बापूच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असे. गावातून आणलेल्या शिळ्या भाकरीवरच नंदीवाले कुटुंब अवलंबून असत.


नंदीबैलास गांवात पुजेसाठी घेऊन जाते वेळीस बापूचा पेहराव भारदस्त असे. डोक्याला लाल फेटा, तीन बटणी सदरा,अंगात जुना कोट,धोतर ,गळ्यात गमज्या, हातात काठी, अशा पेहरावात नंदी बरोबर बापू फिरत असत. बापूची पत्नी रक्कमाबाई ही साधी काष्टा घातलेली नऊवारी लुगडे व दोन्ही खांद्यास झोळ्या असत , एका झोळीत धान्य, भिक्षा व दुसऱ्या झोळीत लहान मूल पाठीवर घालून गळ्यात गाबुगळी (डोहलग ) नंदिबैलाजवळ उभे राहून वाजवित असत. बापू पालावर नंदीबैल घेऊन आलेनंतर नंदीबैलास खुंटीस बांधून नंदीबैलास व इतर पाळलेल्या जनावरांना चारा, गवत व ज्वारीच्या पेंढ्या आणणेसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असत.


नंदीवाले समाज्यातील रक्कमाबाई,बायडाबाई, मालन, पारूबाई, शांताबाई, येलाका या महिला गांव खेड्यातील प्रत्येक आळीतील, रस्त्याने फिरून घरोदारी जाऊन डोक्यावरील टोपलीतील पोत, मणी,सुया,दोर, रिट,लहान मुलांचे काळे मनी, मनगटी वाळे, हळकुंड , शिक्केकाई, दातवन, लहान भांडी इत्यादी वस्तू वाडीवस्तीवर जाऊन विकत असत. आपल्या लहान मुलांना पालावर न ठेवता पाटीवरच्या झोळीत घालून फिरत असत. काही ठिकाणी किरकोळ पैसे मिळायचे, पैसे नसेल तर पोटासाठी धान्य मागून घेत असत. त्याचबरोबर जुनी फाटलेले लुगडी, कपडे घेत असत. त्याचबरोबर शिळ्या भाकरी, भाकरीचे वाळलेले तुकडे, गाडग्यात ताक घेवून येऊन आपल्या कुटुंबातील लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवित असत. मागून आणलेल्या लुगड्या -पाताळा पासून चार-पाच पदराचे पाल सुई –धाग्यांने शिवून पाल बनवित असत. तीन-चार लाकडी काठ्या काढून त्यावर तयार केलेले पाल टाकून उभे करून लाकडी खुंट्यांची दोरीने ओढ काढून पालाची घरे बनवित असत. आणि त्यामध्ये राहत असत. उरलेली लुगडी महिला स्वता घालत असत.
मापटे मळा येथे नंदीवालेची पाले असताना अचानक नंदीबैल मरण पावला. त्यामुळे त्यांचा जीवीकेचा आधार संपलेमुळे हवालदिल झाले होते. नंदीबैल हा त्यांच्या जिवातील प्राण होता. त्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली. सर्वांनी शोक आवरून मापटे मळ्याच्या हद्दीमध्ये एक मोठा खड्डा पाडून सदर ठिकाणी समाज्याच्या चालीरिती नुसार पुरले. व सदर ठिकाणी नंदीबैलाचे मंदिर बांधून घेतले. सदर मंदिरासाठी गणपत सातारकर यांनी जागा दिलेली होती. सदर मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा पूजा अर्चा करून नंदीबैलाच्या मंदिरात नैवेद अर्पण करण्यात येतो.


नंदीवाले समाज्याचा कुलस्वामी “व्यंकटरामण्णागोविंदा” या देवतेची पुजा दर महिन्याच्या मंगळवारी करतात, पुजेवेळी नैवेद,गुळ,साखर, नारळ वाहून हळदी- कुंकू लावून कापूर अगरबत्ती लावून समाज्याच्या प्रथेप्रमाणे लोक एकत्र येऊन पुजा करतात. त्याच बरोबर मरगुआई, म्हाकूआई, यल्लमा देवी, ताई आई, बिरोबा, म्हसोबा या देवी देवताच्या पुजा अर्चा करण्यासाठी जात येत असतात. नंदीवाले हे देव देवताच्या पुजा ,प्रार्थना, नवस इत्यादी नित्य व नियमाने करीत असतात.


सातारा जिल्ह्यातील मायणी-कलढोण येथे नंदीवाले समाज्याची दैवते आहेत. दैवते व पितृ पूजेसाठी दर तीन वर्षांनी आषाढी-श्रावणात नंदीवाले समाज कलेढोण येथे एकत्र येऊन देव देवताची जत्रा करतात व पितृपूजा घालतात. सदर ठिकाणी नैवेद्य अर्पण करून नवस फेडने,लग्नविधी जमवीने इत्यादी कार्यक्रम करतात. सदर यात्रेस जाते वेळी अंगात अंगरखा, धोतर ,पटका,कमरेला शेला, डोक्याला लाल रंगी मोठा रुमाल असा फेहराव असे, व महिला काष्टा नऊवारी लुगडे- पातळ घालून जातात. लहान मुलांना कपडे गोंड्याची लहान टोपी , टकुज घालून या पेहरावात जात असतात.
आटपाडी येथे पालाच्या वस्तीवर मरगू आईची (मरीमाता) ची आखाडी जत्रा दरवर्षी नंदीवाले समाज सामुदायिक रित्या करीत असतात. नंदीवाले समाज्यातील कारभारी मंडळीनी आपल्या पालावरती गणपती सातारकर व रामहरी नांगरे पाटील (माजी सरपंच) यांना आखाडी जत्रेच्या भोजनासाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी सातारकर व नांगरे- पाटील यांनी नंदीवाले समाज्यास म्हणाले की, तुम्ही असे किती दिवस भटकत फिरणार आहे.

आटपाडीत स्थायिक व्हा, असे म्हणताच नंदीवाले म्हणाले आम्ही भटके लोक आम्हाला राहायला कोण जागा देणार आहे ? त्यावर रामहरी नांगरे- पाटील म्हणाले माझ्याकडे पठाण माळावरती जमीन आहे. माझ्या मालकी हक्काच्या जमिनीतील गट नंबर -३७४५ मधील जागा तुम्हास राहणेस देत आहे. तुम्ही खरेदीपत्र करून कायम स्वरूपी राहवे, प्रत्येक नंदीवालेस जमीन देतो असे म्हटल्यावर नांदेवाले समाज्यास अत्यंत आनंद झाला. देव देवतांचे आभार मानू लागले. त्यानंतर सन १९८४-८५ साली सदर गट नंबर -३७४५ मधील प्रत्येक नंदिवालेनी घरासाठी जागा खरेदी करून राहू लागले. व रामहरी नांगरे -पाटील यांचे मनोमन आभार मानू लागले. जमीन खरेदी केलेनंतर डोळ्यात आनंद अश्रू येऊ लागले होते, कारण अनेक पिढ्या भटकंतीचे,फिरस्ते चे जीवन जगावे लागले आहे, जमीन जागेची मालकी काय असते यांचा प्रत्यक्ष अनुभव अनेक पिढ्या नंतर आलेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते.
आटपाडी भागात नंदीवाले समाज्यात भांडण -तंटे वाद-विवाद झालेतर जात पंचायत बसवित असत. सदर ठिकाणी गोल रिंगण करून समोरा-समोर बसवून भांडण वादविवाद मिटवीत असत. काहीवेळा तर चार-पाच दिवस लागत असत. परंतु जात पंचायत पूर्ण वाद मिटवूनच उठत असत. नंदीवाले कोर्ट कचेरी कडे जात नसत. जात पंचायतीचा निर्णय मान्य करीत असत.

नंदीवाले समाज्यात घट स्फोटाची पद्धत अथवा रिवाज नाही. सदर समाज्यात विधवा विवाहास मान्यता आहे. सदरचे लोकांमध्ये मयत झाले तर ते दहन करीत नाहीत, जमिनीत पुरतात. नंदीवाले समाज्यात तेलगु, कन्नड, मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलतात. तसेच पूर्वी स्त्रियांच्या केसाला व कालवनास (रस्सा) कधी ही तेल मिळत नव्हते. सदरचे पुरुष व स्त्रिया कुटुंबाच्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी गाव गाड्यातील वस्त्याच्या वाटा पायानी तुडवीत जात असत. पोटाची खळगी भरणेसाठी व जिवंत राहणेसाठी त्यांना आटापिटा सहन करावा लागत असे. कुठल्याही गावात त्यांना जमीन नव्हती, गांव नव्हते, पोटासाठी कष्ट करणे शिवाय त्यांना पर्याय नसे. सामाजिक व्यवस्थेने त्यांचे माणूस पण संपवले होते. नंदीवाले गाव खेड्यातील लोकांचे मनोरंजन करणारी जमात आज ही लोकप्रिय आहे.


सध्या आटपाडी येथील नंदीवाले समाज सूर, सनई, ताशा, ढोल,झांज,हालगी वाद्य वाजविणेचे काम करीत आहेत. तो संच चालविणेचे काम रावसाहेब पवार, भाऊसाहेब पवार, अंकुश पवार, दादासाहेब पवार, नाना पवार ,शंकर पवार इत्यादी लोक पारंमपारिक वाद्य वाजविण्याचे काम करतात. तरुण मुलांनी हलगी ग्रुप काढला आहे, त्यामध्ये बाळासो पवार, तानाजी पवार ,सौरभ पवार ,सिद्धनाथ पवार, रमेश पवार, मारुती पवार हे तरुण हलगी वाजविण्याचे काम करतात. काही मंडळी भंगार गोळा करण्याचे काम करतात. काहीजण भांड्याचा व्यवसाय करतात, काही स्त्रिया अजून ही डोक्यावर टोपलीत भांडी घेवून घरोघरी जाऊन लहान -मोठी भांडी विक्री करतात. समाजातील मुले सध्या शिक्षण घेऊ लागले आहेत. नोकरीचे प्रमाण अल्प आहे. सामाजिक सुधारना थोडी बहुत होऊ लागली आहे. पालातील निवास आत्ता पत्र्याच्या घरात येऊ लागला आहे. लोकसंख्येचे प्रमाण अजून ही अल्प आहे.


अशा पद्धतीने गावाच्या बाहेर राहणारा फिरस्ता , भटका असणारा नंदीवाला समाज परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्राचा उपभोग घेऊन आटपाडीच्या माणमातीच्या संस्कृतीत आनंदाने राहून जीवन जगत आहे.

लेखक,
आयु ; . विलास खरात
आटपाडी

मो.नं.९२८४०७३२७७

Views: 262
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी व खानापूर तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत जाहीर

आटपाडी व खानापूर तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)