आटपाडी व खानापूर तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत जाहीर
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी व खानापूर तालुक्यातील एकूण 34 पोलीस पाटील पदाचे आरक्षण तहसील कार्यालय विटा येथे पार पडले. या वेळेला प्रांताधिकारी संतोष भोर उपस्थित होते.
ज्या गावांमध्ये पोलीस पाटलांच्या रिक्त जागा आहेत त्या गावचा पदभार दुसऱ्या गावच्या पोलीस पाटलाकडे दिल्याने नागरिकांना विविध प्रकारचे दाखले घेताना अडचण निर्माण होत होती. पोलीस पाटील पदांची भरती लवकरच करावी यासाठी अनेक स्तरातून मागणी होत होती. अखेर शेवटी आज प्रांत कार्यालयामध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये घानवड_ अनुसूचित जाती स्त्री, माडगूळे अनुसूचित जाती, रेवणगाव अनुसूचित जाती स्त्री, चिखलहोळ अनुसूचित जाती, बानुर्गड अनुसूचित जाती, पांढरेवाडी दि. अनुसूचित जाती स्त्री, विठलापूर -अनुसूचित जमाती, गळवेवाडी -अनुसूचित जमाती, तळेवडी -अनुसुचित जमाती स्त्री, कौठळी अनुसूचित जमाती, काळेवाडी अनुसूचित जमाती स्त्री, रेनावी_ विशेष मागास प्र वर्ग, लेंगरेवाडी खुला स्त्री,धोंडगेवाडी विमुक्त जाती (अ). स्त्री, मोही_ भटक्या जमाती (ब) स्त्री पडळकरवाडी भटक्या जमाती (क) (ड) ,
मिटकी भटक्या जमाती क ड, कुरुंदवाडी भटक्या जमाती क ड स्त्री, लिंगीवरे इतर मागास प्रवर्ग स्त्री, देवनगर_ इतर मागास प्रवर्ग, लेंगरे_ इतर मागास प्रवर्ग स्त्री हिंगणगादे_ इतर मागास प्रवर्ग स्त्री सांगोले_ इतर मागास प्रवर्ग स्त्री मासाळवाडी इतर मागास प्रवर्ग, मादळमोठी इतर मागास प्रवर्ग स्त्री, वाळुज ,इतर मागास प्रवर्ग ,पंचलिंगनगर इतर मागास प्रवर्ग, पळशी इतर मागास प्रवर्ग स्त्री, भाग्यनगर (भाकोचीवाडी) इतर मागास प्रवर्ग स्त्री, जाधव नगर_ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, शेंडगेवाडी_ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, यपावाडी_ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, पुजारवाडी (आ) _ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक,ताडाचीवाडी खुला विभूतवाडी खुला वरील प्रमाणे 35 गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.







