कला व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्रा. कु. भारती मारुतीराव देशमुखे यांना पीएच.डी. पदवी प्रदान.
आटपाडी :- श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या आटपाडी येथील कला विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या सहाय्यक प्रा. कु. भारती मारुतीराव देशमुखे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून “निर्मल वर्मा के कथा साहित्य में अभिव्यक्त नारी विषयक दृष्टिकोन” या शोध प्रबंधासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
सदर शोध प्रबंध सादर करण्यासाठी मुधोजी महाविद्यालय फलटणचे माजी प्राचार्य डॉ.राजेंद्र शहा व शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. तानाजीराव पाटील, सचिव मा. श्री. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री.मुन्नाभाई तांबोळी, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







