आरोग्य मंत्री मा.डॉ. प्रा.श्री तानाजी सावंत यांचा मंत्री कार्यालय येथे श्री. प्रवीण लटके यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आरोग्य सेवक दिनेश घोलप यांची नेमणूक
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश घोलप यांचे नुकतेच आरोग्य मंत्री कार्यालयातील माननीय श्री प्रवीण लटके यांचे स्वीय सहाय्यक म्हणून नेमणूक झाली असून आरोग्य सेवक दिनेश घोलप यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
दिनेश घोलप हे 2018 पासून खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवक म्हणून काम करीत होते मनमिळावू स्वभावाचे सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे असे दिनेश घोलप होते, त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच पावती म्हणून शासनाने त्यांची
स्वीय सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.







