आटपाडी तालुक्यात वन विभागाच्या आशीर्वादाने वृक्ष तोड जोमात
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यामध्ये वन विभागाचे वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्या आशीर्वादाने वृक्ष तोड जोमात सुरू आहे.
वनक्षेत्रफल अशोक खडे यांना आंबा व जांभूळ वृक्षाची तोड होत असताना अनेक नागरिकांनी फोन करून वृक्ष तोड चालू असल्याची माहिती दिली होती.
परंतु त्यांनी जाणून बुजून काना डोळा केला असून दस्तुर खुद्द वनक्षेत्रपाल अशोक खाडे वृक्षतोडीला प्रोत्साहन देत असल्याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.
आटपाडी चा पश्चिम भागामध्ये आंबा व जांभळ या झाडाची वृक्षतोड सुरू असताना अनेक नागरिकांनी याची कल्पना विभागाला दिली होती. परंतु वन विभागाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व कोणतीही कारवाई न देता वृक्षतोड करणाऱ्यास अभय दिले.
यामुळे वन विभाग व वृक्षतोड यांच्या तील संबंधाबद्दल तालुक्यामध्ये चर्चा झालेली आहे. अनेक दिवसापासून वन विभागाचा कारभार संशय पद असून त्यांच्या या कारभाराची तालुका भर चर्चा रंगली आहे.







