वृक्षलागवडीतील रोपे जगविण्यासाठी पाणी हवे,पण पाण्यासाठी अतीअल्प निधी -वनक्षेत्रपाल अशोक खाडे
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये घरणीकी, मिटकी-(बनपुरी) खरसुंडी व करगणी येथे जवळपास 40 हजार रोपांची लागवड वन विभागामार्फत केली आहे.
वरील चारही ठिकाणी मुरमाट व खडकाची जमीन असल्याने सध्या उन्हाचे दिवस असल्याने रोपांना जास्त पाणी लागत आहे. सरास रोपे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी रोपे जळाली आहेत.
याबाबत वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांना प्रत्यक्ष भेटून विचारले असता ते म्हणाले पाण्यासाठी शासनाकडून निधी कमी आला आहे. जेवढा निधी आहे त्या निधीमध्ये आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
पुढे म्हणाले प्रत्येक रोपासाठी 50 पैसेच निधी आहे. त्यामुळे त्या पैशांमध्ये सतत पाणी देणे बजेटमध्ये बसत नाही.
यावरून वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांना या कामाचे इस्टिमेट दाखवा.त्यामध्ये किती रुपयाची तरतूद आहे. असे म्हटल्यानंतर ते म्हणाले इस्टिमेट माझ्याकडे उपलब्ध नाही ते सांगली कार्यालयात पाठवला आहे. त्यानंतर सांगली कार्यालया मध्ये फोनवरून इस्टिमेट संदर्भात विचारले असता, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की इस्टिमेट आमच्याकडे आले आहे. पण त्याची एक प्रत मुख्यालयामध्ये म्हणजेच आटपाडी वन विभागाच्या कार्यालयामध्ये असते असे सांगण्यात आले.
त्यानंतर वनक्षेत्रपाल अशोक खाडे यांच्याशी संपर्क साधला व इस्टिमेट ची एक प्रत आपल्या कार्यालयामध्ये असते त्या इस्टिमेटमध्ये एका रोपाला पाणी घालण्यासाठी किती पैसे खर्च करायचे असतात हे आम्हाला दाखवा,त्यावर त्यांनी इस्टिमेट दाखवण्यास विरोध केला. मी इस्टिमेट दाखवू शकत नाही असे उद्धट उत्तर दिले.
कुंपणाने शेत खाल्ले
वन विभागाचा कारभार कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असतो. सध्या शासनाने करोडो रुपये खर्च करून तालुक्यामध्ये जवळपास 40 हजार रुपयाची लागवड केली आहे. परंतु ही रोपे जगली पाहिजेत यासाठी अनेक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला परंतु त्यांनाही उडवा उडवीची उत्तरे वनविभागाचे अधिकारी देतात.जर वनविभागाचे अधिकारीच लागण केलेल्या रोपाकडे लक्ष देत नसतील आणि इस्टिमेट मध्ये असणारी रक्कम दाखवत नसतील तर कुंपणाने शेत खाल्ले असे म्हटले तर काय वावगं ठरणार नाही.
कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पण इस्टिमेट पाहिले नाही
याबाबत ज्या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्या ठिकाणच्या वनरक्षकांना सुद्धा विचारले असता आम्हाला इस्टिमेट अद्याप बघायला मिळाले नाही. असे उत्तर मिल्हाले मिळाले. इस्टिमेट हे साहेबांच्या कपाटामध्ये असते असे सांगण्यात आले
वरिष्ठांचे हात वर
याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठांना फोन करून विचारले ,लागण केलेल्या रोपांना पाणी घालण्यासाठी किती पैसे शासनाने मंजूर केले आहेत .याचे इस्टिमेट मिळेल का ? त्यांनीही हात वर केले .तुम्ही आटपाडी कार्यालयातून घ्या असे सांगण्यात आले.
कुंपणाने शेत खाल्ले
प्राचीन काळापासून एक म्हण आहे कुंपणाने शेत खाल्ले_ म्हणजे जो राखण करतो त्यांनीच ते शेत संपवून टाकले खाल्ले याच पद्धतीने लावलेल्या वृक्ष लागवडीवर वन विभागाचे लक्ष असते झाडे जिवंत ठेवण्यासाठी ते आटापिटा करतात. शासन खड्डा काढणे रोप लावणे पाणी घालने यासाठी कोट्यावधीचां निधी देत आहे. परंतु अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. आणि येणारा निधी कुठे जातो हे जनतेलाही समजत नाही. 50 टक्के रोपे जळालेली असतात. मग शासनाकडून येणारा निधी जातो कुठे म्हणजेच कुंपणाने शेत खाल्ले
प्रतिक्रीया
प्रत्येक रोपाला पाणी घालण्यासाठी पन्नास पैशाचा निधी उपलब्ध आहे. इस्टिमेट माझ्याकडे नाही ते सांगली कार्यालयामध्ये आहे.
फोटो ,आटपाडी वन क्षेत्रपाल अशोक खडे







