• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मातृत्वाचे महाकाव्य रमाई:

माणगंगा by माणगंगा
February 7, 2023
in सांगली
0
मातृत्वाचे महाकाव्य रमाई:

मातृत्वाचे महाकाव्य रमाई:

डी एस सावंत

करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य, महासुर्याची सावली आणि कोट्यावधीची माऊली
दीनदुबळ्याची आई म्हणजेच रमाई


कोकणातील दाभोळ बंदराजवळील वनंद या गावी भिकाजी धुत्रे आणि रुक्मिणीच्या पोटी सात फेब्रुवारी 1898 रोजी एका कन्यारत्नाचा जन्म झाला. तो जन्म म्हणजे एका कारुण्यमूर्तिचा, सहनशीलतेचा, परोपकाराचा, सामंजस्याचा आणि कठोर परिश्रमाचा जन्म होता असे म्हणणे वावगे ठरू नये.

बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली रमा. बालपणापासूनच जिच्यावर कष्टाचा डोंगर उपसण्याची पाळी आली ती रमा. जाणतेपण येण्याअगोदरच कष्टाची कदर करणारी रमा खरंच बालपण हरवलेली होती. वयाच्या नव्या वर्षी एका अशा व्यक्तीशी लग्न झाले की, ज्यांनी स्वतःसाठी आयुष्य जगलेच नाही. जगले ते फक्त समाजासाठी. देशासाठी आणि अखिल मानवतेसाठी.

माणसांची पारख असलेले रामजी बाबा यांनी रमा नावाच्या निष्पाप, निरागस, कष्टाळू आणि चुणचणीत मुलीला आपल्या भिवासाठी पत्नी म्हणून केलेली निवड अत्यंत सार्थ ठरली.रमाला शिकलेला पती मिळाला, चांगले सोयरे आणि घर मिळाले म्हणून ती कृत कृत होऊन आपल्या घराच्या उत्कर्षासाठी अपार कष्ट उपसू लागली. 1907 साली भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले, तेव्हा रमाईला आकाश ठेंगणे झाले होते. रमाईमुळे बाबासाहेब एवढे प्रचंड शिक्षण घेऊ शकले आणि हिमालयाप्रमाणे समाजासाठी काम करू शकले. कारण रमाई ही बाबासाहेबांची खरी प्रेरणा होती.

ती पुढे कोट्यावधी असाह्य, दिनदुबळ्यांची माता झाली. ती अत्यंत स्वाभिमानाने भरलेली आणि भारलेलली होती. बाबासाहेबांप्रमाणेच समाजावरही जिवापाड प्रेम करणारी, खऱ्या अर्थाने मातेप्रमाणे प्रेम करणारी माता, म्हणजे रमाई होय.

बालपणीच माता-पितांच्या निधनामुळे पोरकी झालेल्या रमावरती अनेक आघात होत होते. त्यामध्येच 2 फेब्रुवारी 1913 मध्ये रमाईवरती आणखी एक मोठा आघात झाला. तो म्हणजे सुभेदार निवर्तले. त्यानंतर रामजी बाबांना मिळणारी पेन्शन ही आपोआपच पेन्शन बंद झाली. त्यामुळे आर्थिक स्तोत्र बंद झाले.परंतु परिस्थिती पुढे हात न टेकता, ती सर्व आव्हाने स्वीकारत रमाई अविरत कष्ट करत होती. प्राप्त परिस्थितीशी झगडणे हा रमाईचा स्थायीभाव होता. संसार चालवताना कोणती गोष्ट लागत नाही. काबाड कष्टसुद्धा रमाईला पतीच्या इभ्रततीला जपून करावे लागत असे. आपल्या कामामुळे साहेबांना कमीपणा वाटेल असे, शेण गोळा करणे,गोवऱ्या थापने, विकणे वगैरे काम ती संध्याकाळी काळोखा मध्ये करत असे.


माता रमाईचे जीवन अतिशय कष्टाने दुःखाने,दारिद्र्याने, यातनेने आणि उपासमारीने भरलेले होते. तिच्या जीवनामध्ये सुखाला जागाच नव्हती. जागा होती ती फक्त कष्ट, त्याग, प्रामाणिकपणा, परोपकार इत्यादींना होती.
रमाईच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. रमाई गरोदर असतानाच बाबासाहेब विलायतेला पुढील शिक्षणासाठी गेले होते. थोड्याच दिवसात त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव गंगाधर ठेवले. गंगाधर एकदा खूपच आजारी पडला. बाबासाहेब दरमहा आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून कसे तरी पन्नास रुपये रमाईला पाठवत असत. त्यामुळे तिकडे बाबासाहेबांचेही जेवणाचे हाल होत असे व इकडे रमाईच्या संसारालाही ते पुरत नसत. तरीही काटकसरीने अत्यंत कसोटीने तिकडे बाबासाहेबांचा अभ्यास चालला होता आणि रमाईचा व कुटुंबाचा जीवनव्यापनाचा संसार चालला होता. गंगाधरसाठी आता पैसे कुणाचे कुणाकडून घ्यायचे हा प्रश्न पडला होता. म्हणून धैर्य करून बाबासाहेबांनाच रमाने पत्र लिहिले व थोडीफार पैशाची मागणी केली. बाबासाहेबांनी थोडेफार पैशाची व्यवस्था केली. याच काळात काही कार्यकर्ते मदत गोळा करून रमाईला देण्यासाठी आले. परंतु स्वाभिमानी रमाईने त्यांना स्पष्ट आणि विनम्रपणे नकार दिला. गंगाधर जास्तच आजारी पडल्यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला. बाबासाहेब त्याच्याजवळ नव्हते. आपल्या बाळाचे त्यांना तोंडही पाहता आले नाही. त्याचे कोडकौतुक करता आले नाही. याचे बाबासाहेबांना प्रचंड दुःख झाले. आपल्यावर कोणतेही संकट आले तरीही आपण स्वाभिमानानेच राहिले पाहिजे. आपल्या घराण्याची इज्जत ठेवली पाहिजे. अशा बाण्याने राहणारी रमाई होती. कार्यकर्त्यांची मदत स्वीकारून रमाई आपल्या पोटच्या गोळ्याला वाचू शकली असते पण त्यांनी ते तसे केले नाही या त्यागाला आपण काय म्हणावे!

त्यांचा तिसरा मुलगा राजरत्न याच्या बाबतीतही तसेच झाले. राजरत्न एक दिवशी ताप आला. औषध उपचार चालू होता. त्याचे रूपांतर निमोनिया मध्ये झाले. बाबासाहेब हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते. नुकतीच वकिली चालू केल्यामुळे त्यांना पुरेसे पैसे मिळत नव्हते. राजरत्नला डबल निमोनिया झाला. त्याची प्रकृती ढासळली आणि क्रूर काळाने राजरत्न ला हिरावून नेले. त्याच्या अंत्यविधीची सामग्री आणण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. या असंख्य वेदना काळीज पिळवटून टाकणाऱ्या होत्या. दोघेही पती-पत्नींना पुत्र वियोग झाला होता. बाबासाहेब म्हणाले राजरत्न गेल्याने आमच्या आयुष्याचे सहारा वाळवंट झाले आहे.

पुढे 1932 साली बाबासाहेब इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी जाणार होते, रमाईची तब्येत खूपच बिघडली होती. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. त्यावेळेला बळवंत वराळे भेटण्यासाठी आले होते. बाबासाहेब चिंतेत असताना विचारले की बाबासाहेब काय झाले आहे त्यावेळेला त्यांनी सांगितले की, रमाई आजारी आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी हवा पाणी बदलायला डॉक्टरने सांगितले आहे. बळवंत वराळे म्हणाले साहेब मी त्यांना धारवाडला घेऊन जाऊ का? त्या वेळेला बाबासाहेबांनी होकार दिला आणि रमाई बरोबर सर्वच लोक निपाणीला गेले. तिथला एक प्रसंग वस्तीगृहाला त्या महिन्यामध्ये ग्रँट मिळाली नव्हती. त्यामुळे तेथील मुलांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला होता. तेथील वाणी अन्नधान्य उधारीवर देत नव्हता.बळवंतराव काळजीत होते. त्यावेळेला ही गोष्ट रमाईच्या कानावर आल्यावर रमाईने विचारले काय झाले आहे? त्या वेळेला त्यांनी ती गोष्ट सांगितल्यावरती क्षणाचा ही विलंब न करता आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या बळवंतराव वराळेकडे दिल्या आणि म्हणाल्या मास्तर या बांगड्या घ्या आणि त्या गहाण ठेवून मुलांसाठी धान्य आणा अशा या थोरत्यागी, वासल्यमूर्ति रमाईच्या उदारपणाला काय म्हणावे.

अपार कष्ट करून रमाई चंदनाप्रमाणे झिजून केल्या होत्या सततची उपासमार दुःख दैन्य दारिद्र्य आणि वरून काबाड कष्ट त्यामुळे त्यांच्या हाडाची काडे झाली होती. वरून साहेबांची काळजी. त्यांना कोणी मारतील काय, त्यांचे काय बरे वाईट होणार तर नाही ना, या काळजीमुळे त्यांना टीबी झाला होता. त्यातच 27 मे 1935 ला बाबासाहेबांची प्रिय रामू बाबासाहेबांना आणि समाजाची माता रमाई सर्वांना सोडून गेली आणि सर्व समाज पोरगा झाला. बाबासाहेब अत्यंत दुःखी अंतकरणाने म्हणाले रामू तू माझ्यासाठी किती त्रास किती यातना सहन केल्या पण मी मात्र तुला कसलेही सुख देऊ शकलो नाही. असे म्हणून बाबासाहेब रडू लागले. त्यांचा अंत्यविधी केल्यानंतर बाबासाहेबांनी आठवडाभर स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले. सात कोटी अस्पृश्यांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचा आधार निघून गेला. बाबासाहेबांची प्रचंड काळजी वाहणारी तसेच आपल्या डोळ्यात प्राण आणून आयुष्यभर आपल्या पतीची वाट पाहणारी, सदाचारणी निघून गेली. ती आपल्या पतीच्या यशस्वी जीवनाचा आनंद आणि उपभोग न घेताच काळाच्या पडद्याआड निघून गेली.

बाबासाहेबांचे रामु वरती आफाट प्रेम होते. तिने संसारासाठी केलेल्या त्याग बाबासाहेबांना सतत आठवत होते. म्हणून त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या जगप्रसिद्ध इंग्रजी ग्रंथ त्यांनी आपल्या लाडक्या रामूला अर्पण केला. त्यामध्ये ते म्हणतात, हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याची पवित्रता याशिवाय आमच्या वाटेला आलेल्या हालअपेष्टा भोगण्याची तिची सिद्धता व निर्विकार सहनशिलता याबद्दल व मला तिचे वाटणारे कौतुकाचे प्रतीक म्हणून प्रिय रामू हीच्या स्मृतीस अर्पण! कठीण प्रसंगातूनही मार्ग कसे काढले पाहिजेत. स्वाभिमानी,निर्मळ, सोजवळ आणि वासल्यरुपी जीवन कसे जगले पाहिजे याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रमाई सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंतीच्या सर्व भारतीय बांधवांना आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Views: 217
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश …..,विरोधकांच्या सर्व आयुधावर मात ….. मायणीतील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त  – मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर

२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश .....,विरोधकांच्या सर्व आयुधावर मात ..... मायणीतील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त - मा. आ. डॉ.दिलीपराव येळगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)