झरे गावचे सुपुत्र सचिन राजमाने यांची विटा आर्बन बँकेच्या संचालक पदी निवड
झरे ता.आटपाडी गावचे सुपुत्र , प्रख्यात व्यापारी , माजी आमदार सदाभाऊ पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते , मनमिळाऊ स्वभावाचे सचिन (भैय्या) राजमाने यांची विटा आर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाली.
चेअरमन वैभवदादा पाटील यांनी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. व नूतन संचालक सचिन राजमाने यांचा सत्कार करण्यात आला.
राजमाने यांच्या निवडीने झरे गावच्या भूमीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून राजमाने यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







