• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

रसायनशास्त्रात पीएचडी मिळवणारी डॉ.सावित्री वाक्षे मोटे यांचा मायभूमीत सन्मान…

माणगंगा by माणगंगा
February 15, 2023
in सांगली
0
रसायनशास्त्रात पीएचडी मिळवणारी डॉ.सावित्री वाक्षे मोटे यांचा मायभूमीत सन्मान…

रसायनशास्त्रात पीएचडी मिळवणारी डॉ.सावित्री वाक्षे मोटे यांचा मायभूमीत सन्मान…


आटपाडी प्रतिनिधी


वाक्षेवाडी ता. आटपाडी येथील सावित्री वाक्षे यांनी रसायनिक शास्त्रामध्ये पीएचडी मिळवली त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला आपण थोडंसं त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहूया .त्यांनी पीएचडी मिळवल्यानंतर अनेक स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे आपणही थोडसं त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहूया.


घरापासून शाळेचे अंतर हे अडीच किलोमीटर होते .अडीच किलोमीटर पायपीट करत शाळा गाठायची दिवसभर शाळा सुटल्यावर घरचे काम नेहमीच पाचवीला पुजलेले असायचे. अभ्यास करायला वेळही मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये पहिली ते चौथीच शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी येथे झाले पहिल अक्षर हे गुरुवर्य मोहिनी मुढे यांनी हातात पेन्सिल धरून स्वतःचे नाव काढायला शिकवले.


चौथी ते सातवी पर्यंतचे शिक्षण वाक्षेवाडी जिल्हा परिषद शाळेत झाले. गणवेश फाटला तरी त्याला ठिगळे लावून वर्षभर कसा वापरता येईल याकडे जास्त कल असायचा .पहिली ते सातवी पर्यंत वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही.. आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण लोकमान्य हायस्कूल निंबवडे या ठिकाणी झाले. घरापासून निंबवडे दोन किलोमीटरवर होते पायपिट पाचवीलाच पुजलेली होती.


परिस्थिती बेताची असल्याने शाळेला जायला सायकल सुद्धा मिळाली नव्हती.. वय जरी कमी असलं तरी दहावी झाली की मुलींचं लग्न करून देण्याची परंपरा होती .परंतु माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये टॅलेंट पाहिले आणि पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या अंगावरती फाटके बनेल आणि फाटलेला टॉवेल आडवा लावून आयुष्यभर शेती केली व शेळ्या मेंढ्यांच्या जीवावर आमच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट घेऊन आम्हाला लागणार आर्थिक देण आहे ते कमी पडू दिलं नाही.


अकरावी बारावीचा शिक्षण भवानी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आटपाडी या ठिकाणी झाले. बारावीनंतर एंट्रन्स एक्झाम देऊन मला बीएससी ला आटपाडी कॉलेज ला ऍडमिशन मिळाले. मला डॉक्टर व्हायची इच्छा होती परंतु मी डॉक्टर होऊ शकली नाही. म्हणून मी बी एस सी ला प्रवेश घेतला बीएससी मध्ये मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यावेळी मला 85 टक्के मिळाले यामध्ये व्हि.व्हि.जाधव सरांचे खूप योगदान लाभले.
पुढे रसायनशास्त्रामधून एमएससी केली. काही काळ शिकवणी चे काम केले एमपीएससी मधून सिलेक्शन झाल्यावर गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी काही काळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले..


लग्न झाल्यावर माझ्या सासरच्या लोकांनी ही मला पीएचडी करण्यासाठी खूप मदत केली 2016 साली पीएचडी करण्यासाठी मी प्रवेश घेतला. 2022 साली मला कोल्हापूर विद्यापीठातून पीएचडी मिळाली. पीएचडी साठी माझा विषय synthesis and photophysical behaviour of bioactive Aza heterocycles यावर मी संशोधन केले या संशोधनाचे फायदे सर्वसामान्य लोकांना बाजारात मिळणारी औषधे परवडणारी नाहीत त्यासाठी प्रभावी नॅनो पार्टिकलची निर्मिती केली.


मी आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये जाऊन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये १० हून अधिक ठिकाणी माझे संशोधन सादर केले आहे…


सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या माहेरून वडिलांची जिद्द व सासरच्या पती व कुटुंबाचे मार्गदर्शन मिळाल्याने मी यशाचे शिखर गाटले.
तिच्या संशोधनाचा ठसा जगामध्ये उठला गेला. वाक्षेवाडी गावची कन्या डॉक्टर सावित्री वाक्षे मोटे यांचा सत्कर करण्यात आला.यावेळी उपस्थितीत सर्व शिक्षक तसेच माजी सरपंच आप्पासाहेब वाक्षे, उपसरपंच आबासाहेब गलांडे, आदर्श शिक्षक अशोक मोटे, भानुदास मेटकरी ,सावित्री वाक्षे यांचे वडील बाबासाहेब वाक्षे, तसेच वाक्षेवाडी गावचे पोलीस पाटील आप्पासाहेब मोटे, अजित वाक्षे विश्वनायक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय वाक्षे, अंगणवाडी सेविका संगीता वाक्षे शांताबाई वाक्षे, आणि डॉ. यांचे पती डॉक्टर गुरुनाथ मोटे उपस्थितीत होते.

Views: 231
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जिओ डिजिटल फायबर कंपनीने रस्ता व वृक्षाची वाट लावली

जिओ डिजिटल फायबर कंपनीने रस्ता व वृक्षाची वाट लावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)