आमदार जयंतराव पाटील यांचे आटपाडीकरांकडून अभिष्टचिंत
आटपाडी दि . १६ ( प्रतिनिधी )
महाराष्ट्राचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे इस्लामपूर येथे आटपाडीकरांनी अभिष्टचिंतन केले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता यमगर तालुका सरचिटणीस समाधान भोसले, राष्ट्रवादी अपंग सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ लोहार, नवनाथ भोसले यांनी आज इस्लामपूर येथे आमदार श्री . जयंतराव पाटील साहेबांची भेट घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
आयुष्याचे शतक पार कराच . तथापी लवकरच तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हा . तो दिवस आम्हांला बघायचा आहे, साजरा करायचा आहे, अशा अंतरीच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवकचे निरीक्षक अरुण आसबे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन माणीकराव आबा पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेबबापू पाटील, जयंतराव पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक नेताजीराव पाटील, विनायक मुगळे, प्रसिद्धी विभाग प्रमुख विश्वास पाटसूते इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .







