तडवळेत घरात मांजर येऊन नुकसान करते म्हणून भांडण, माझी पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला मारहाण चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
आटपाडी प्रतिनिधी
तडवळे ता. आटपाडी गावचे माझी पोलीस पाटील पांडुरंग आवळे यांच्या घरामध्ये शेजारच्या घरातील मांजर येऊन घरातील साहित्य खाली पाडून नुकसान करते म्हणून शेजाऱ्यांबरोबर अनेक दिवसांपासून वाद होता.
त्यातच दिनांक 16 फेब्रुवारी रोजी घरात येऊन घरातील साहित्य खाली पाडून नुकसान केले.
याबाबत शेजाऱ्यांना आपले मांजर सांभाळता येत नाही का असे तक्रारदाराच्या पत्नीने मोठ्याने आवाज केल्याने चिडून जाऊन शेजारी शोभा केंगार ,माधुरी केंगार ,सचिन केंगार, रमेश केंगार या चौघांनी मिळून तक्रारदार व त्यांची पत्नी यांना मारहाण करून जखमी केले आहे .याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






