आटपाडी तहसील कार्यालयातील लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तहसील कार्यालयातील लोकसेवक महबूब नबीलाल बागवान महसूल सहाय्यक तहसीलदार कार्यालय आटपाडी यांना तीन हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी पकडले व कारवाई केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने निवासी नायक तहसिलदार यांच्या समक्ष सुरू आहे.
सदर सुनावणी मध्ये वरिष्ठांना सांगून चाप्टर केस मध्ये पर्सनल बॉण्ड वर सोडवण्यासाठी व चाप्टर केस निकाली काढण्यासाठी चाप्टर केस टेबल चे काम पाहणारे महसूल सहाय्यक महबूब बागवान यांनी स्वतः करिता 5 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी २०/०2/२३ रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 20 /2 /2023 रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये महबूब नवीलाल बागवान महसूल सहाय्यक यांनी तक्रार यांना चाप्टर केस मध्ये पर्सनल बॉण्डवर सोडवण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंतिम 3 हजार रुपये लाचेची मागणी केली 3 हजार रुपये 2 दिवसात आणून देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर आज दिनांक 21/ 2/ 2023 रोजी लोकसेवक महबूब बागवान महसूल सहाय्यक यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय आटपाडीच्या आवारात सापळा लावला असता ,लोकसेवक महबूब बागवान यांच्याकडे लाचेची मागणी करून 3 हजार रुपये लाच स्वीकाराने असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्या अनुषंगाने मेहबूब बागवान महसूल सहाय्यक यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई अमोल तांबे ,पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस उप आयुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाच लचकत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील ,पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सांगली, दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सीमा माने ,सलीम मकानदार, राधिका माने, ऋषिकेश बडनीकर, अतुल मोरे ,सुदर्शन पाटील ,चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.
तसेच नागरिकांना आव्हान करण्यात येते की लाज मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधीक्षक लाचलुचपक प्रतिबंधक विभाग बदाम चौक सांगली येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 या क्रमांकावर तसेच हेल्पलाइन क्रमांक 10 64 किंवा व्हाट्सअप नंबर 78 75 33 33 33 मोबाईल नंबर 98 21 88 0 73 7 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







