• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अलमट्टीचे पाणी मागे येईना तरीही महापूर का हटेना ?

माणगंगा by माणगंगा
July 27, 2021
in सांगली
0
अलमट्टीचे पाणी मागे येईना तरीही महापूर का हटेना ?

अलमट्टीचे पाणी मागे येईना तरीही महापूर का हटेना?

अलमट्टीचा फुगवटा नाही,राजापूर बंधाऱ्यात धोकादायक स्थिती नाही तरी देखील कोल्हापूरला महापुराने वेढले गेले. असे कसे घडले?

अलमट्टी धरणात , कर्नाटक सरकारने अलमट्टीतून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले आहे. २२ जुलै रोजी झालेल्या पावसाने धरणामध्ये प्रचंड पाणी येत होते. त्यामानाने कोयना, वारणा, दूधगंगा, राधानगरी आदी धरणांतून खूप कमी पाणी सोडले जात होते. धरणातून कमी पाणी सोडले तरीही हा महापूर कोठून आला?

दिनांक २२ जुलैचे चोवीस तास! पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसह उर्वरित महाराष्ष्ट्रात अतिवृष्ष्टी नव्हे तर नव्वद ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याची नोंद पाहिली तर कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला ६३७ मिलीमीटर होती. राधानगरी येथे ५७६ मिलीमीटर तर त्याच तालुक्यात तुलसी धरणाच्या परिसरात ८९६ मिलीमीटर झाल्याची नोंद आहे. एका दिवसात इतका प्रचंड पाऊस झाल्यावर सर्व नद्यांना महापूर येणार होता.

अलमट्टी धरणात पाणी साठविले जाते. त्याचा फुगवटा येताे आणि पंचगंगा, कृष्णा, वारणासह सर्व नद्यांना महापूर येतो, तो अनेक दिवस टिकून राहतो. त्यास अलमट्टी धरणाचा साठा जबाबदार आहे, अशी समजूत करून घेण्यात आली आहे. अलमट्टी धरणापासून दूरवर असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राजापूर बंधारा येथे कृष्णा नदीची पाणीपातळी अठ्ठावन फुटांवर पोहोचली की, धोका निर्माण होतो. राजापूर बंधाऱ्याजवळ दि. २३ जुलै रोजी धोका पातळीला पाणी पोहोचण्यास सतरा फूट पाणी कमी होते. तरीसुद्धा कोल्हापूरला राजाराम बंधाऱ्यावर पंचावन फुटावर पाणी पोहोचले होते. धोका पातळी ४३ फूट आहे. अलमट्टीचा फुगवटा नाही,राजापूर बंधाऱ्यात धोकादायक स्थिती नाही तरी देखील कोल्हापूरला महापुराने वेढले गेले. असे कसे घडले?
अलमट्टी धरणात ७४ टीएमसी पाणीसाठा होता. ते पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप ४९ टीएमसी साठा वाढला पाहिजे. दरम्यान, कर्नाटक सरकारने अलमट्टीतून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले आहे.

आपले जलसंपदा मंत्री मागणी करीत होते की, दोन लाख क्युसेक पाणी सोडावे. गेल्या २२ जुलै रोजी झालेल्या पावसाने धरणामध्ये प्रचंड पाणी येत होते. त्यामानाने कोयना, वारणा, दूधगंगा, राधानगरी आदी धरणांतून खूप कमी पाणी सोडले जात होते. उदा. कोयना धरणातून पावसाचे पाणी एका तासाला तीन लाख सत्तर हजार क्युसेक येत होते. याउलट धरणातून नदीपात्रात केवळ वीस हजार क्युसेक सोडत होते. याचा अर्थ साडेतीन लाख क्सुसेक पाणी धरणातच अडविले जात होते. ते सर्व पाणी कोयनेत आले असते तर पुढे कऱ्हाड शहराला धोका निर्माण झाला असता. कृष्णा किनारीि अतिप्रचंड धोका निर्माण झाला असता. धरणातून आवश्यक असेल तेंव्हा पाणी सोडावे लागते आणि पुढे पाऊस थांबणार असेल तर पाणी अडवून ठेवता आले असते. यावेळच्या धरणांनी महापुराची तीव्रता कमी करायला मदतच केली. अद्याप साठ टक्के पावसाळा शिल्लक आहे आणि धरणात पाणीसाठा वीस टक्क्यांनी कमीच आहे. त्यामुळे धरणांना धोका नाही.


धरणातून कमी पाणी सोडले तरीही हा महापूर कोठून आला. अलमट्टीचा प्रश्न निकालात निघाला. त्याचा फुगवटा महाराष्ट्रात येत नाही. आता तर आलाच नव्हता. अलमट्टीचे पाणी मागे आलेच नाही तरी महापुराचे पाणी पुढे सरकत नव्हते. ते वेगाने वाढत होते. कोल्हापुरात सायंकाळी इशारा पातळीवरील ३९ फुटांवरील पाणी रात्री बारा वाजेपर्यंत ४३ फुटांवर म्हणजेच धोकादायक पातळीवर जाऊन दाणादाण उडाली.


शुक्रवारी सायंकाळी ते पंचावन फुटांवर गेले. आता काय करणार आहात? राधानगरीला किंवा धामोडजवळ तुलसी धरणाच्या परिसरात संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाकाठी सरासरी पडणारा सहाशे मिलीमीटर इतका पाऊस चोवीस तासांत पडत असेल तर महापूर येणारच होता. पावसाने आता आपले अंगभूत गुण बदलायला सुरुवात केली आहे. ढगफुटीसदृश पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणात अनेक ठिकाणी ती झाली. चिपळूणचा महापूर त्याचाच प्रकार आहे. वाशिष्ठी नदीत कोयना धरणातून पाणी घेऊन वीजनिर्मिती केली जाते. ते पाणी वाशिष्ठी नदीला सोडले जाते. गेल्या गुरुवारी चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीतून पावणेदोन लाख क्युसेक पाणी वाहत होते. कोयनेतून वीजनिर्मिती करून कमीतकमी तीन हजार, तर जास्तीत जास्त आठ हजार क्युसेक पाणी सोडले जाते. आता वाशिष्ठीच्या महापुराला कोयनेचे पाणी कसे कारणीभूत असेल?


वाशिष्ठी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने चिपळूणला अचानक महापूर आला. याचे अनुमान सांगितले गेले पाहिजे. चिपळूणच्या परिसरात पुढील अठ्ठेचाळीस तासांत किती पाऊस पडेल, याची गणना झाली पाहिजे. तसा अंदाज मांडला पाहिजे. महाबळेश्वर परिसरात आणि जावळी तालुक्यातील वीस गावांना दरडी कोसळून नुकसान झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे कारण ढगफुटीने प्रचंड पाण्याचा लोंढा येणे हेच आहे. जंगलात किंवा डोंगरदऱ्यांच्या खाेऱ्यात रात्री -अपरात्री ढगफुटीने कितपत पाणी पडले आहे याचा अंदाजच नाही. म्हणून यावेळी दरडी कोसळल्या आणि त्यात शंभराहून अधिक माणसं मृत्युमुखी पडली आहेत

. हे रोखता येणार नाही. अंदाज बांधता येईल आणि लोकांना सावध राहता येईल. चिपळूणमध्ये ही सावधानता पाळण्यासाठी अंदाज व्यक्त केला गेला नाही. परिणाम सारे शहराचे तळमजले पाण्यात! वरचा मजला असणारे वरच अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्याची माेठी मोहीम राबवावी लागली.
हवामान बदलाचा आणि या ढगफुटींचा संबंध कितपत आहे याचा अभ्यास करावा लागणार आहे. दमदार, संततधार पावसाने कमी नुकसान होते. पण ढगफुटीसारख्या पावसाने अचानक पाण्याचे लोंढे येणे, घरे वाहून जाणे, मोटारगाड्या पाण्यात बुडणे, बाजारपेठांत पाणी शिरणे, रस्ता वाहून जाणे, जनावरे मृत्युमुखी पडणे अशा असंख्य घटना घडतात.


कोल्हापूर शहराची ही अवस्था केवळ एका दिवसाच्या पावसाने झाली. शहरातून बाहेर पडायला एकही रस्ता शिल्लक राहिला नाही. पुणे, बेळगाव, कोकण, गारगोटी, आजरा, चंदगड, सांगली, इचलकरंजी या एकाही शहराकडे कोल्हापुरातील माणूस प्रवासाला निघू शकत नाही. ही अवस्था तयार झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा व कृष्णा खोऱ्यातील जिल्हे म्हणून स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून अभ्यास करावा लागणार आहे. आपल्या परिसरात असलेली धरणे देखील जोखीम ठरू शकतात.

आपला प्रदेश हा ढगफुटीसारख्या संकटाला सामोरे जाणारा नाही, असे संकट येतच नाही म्हणून आपण विकासाचे वेडेवाकडे दांडपट्टे खेळले आहेत. सर्वप्रथम कोल्हापूर शहराची हद्दवाढ केली पाहिजे. कळंबा ते सरनोबतवाडी ते उचगांव ही सात गावेच हद्दवाढीत घ्यायची. शहर पूर्वेस आणि दक्षिणेस वाढू दिले पाहिजे. हे जाणीवपूर्वक करून नदीचे पाणी येणाऱ्या परिसरात आता बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. गेली पन्नास वर्षे हद्दवाढ केलेली नाही. बांधकाम व्यवसायिकांनी नदीच्या दिशेनेच बांधकामे केली, कारण तोच भाग हद्दीत होता. सांगली-मिरज शहराने देखील सुधारणा करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते तेथे बांधकाम नसते आणि गवताशिवाय शेती नसते. नदीपर्यंत उसाची शेती करुन पाणी अडविण्याचा प्रकार आहे. आज गवताला पशुखाद्य म्हणून खूप मागणी आहे. कोल्हापूरमध्ये एक शेतकरी गवत उत्पादक आहे. तो शेती करीत नाही. पेरणी, मळणी, नांगरणी काही करावे लागत नाही. शेतकरी स्वत:च येऊन गवत कापून घेऊन जातात. हा उत्पादक पेसे मोजण्याचे फक्त काम करतो. उसापेक्षा कमी पैसे मिळतात, पण खर्च काही नाही. फायदाच फायदा आहे.


सातारा शहरात हद्दवाढ झाली, पण नदी दूर असल्याने धोका नाही. कऱ्हाड शहराने सावध झाले पाहिजे. दक्षिण महाराष्ट्रातील जवळपास चोवीस धरणे आणि तेवढ्याच नद्या, सह्याद्री पर्वतरांग, त्यांचे संवर्धन, पडणारा पाऊस यांचा साकल्याने विचार करणारे तज्ज्ञांचे एक प्राधिकरण स्थापन करावे लागणार आहे. शिवाजी विद्यापीठाची त्यासाठी मदत घेता येऊ शकते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून कोकणात जाणारे नऊ घाट रस्ते आहेत.

तेच अधिक मजबूत करावेत . दहावा घाटरस्ता करू नये. त्याची रज नाही. कोल्हापूरची रेल्वे वैैभववाडी मार्गे कोकणला जोडली तर जयगड बंदर आणि उत्तर गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडून घेणे सोपे जाणार आहे. याशिवाय नवी रेल्वे नको, घाटरस्ता नको आणि दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूरशिवाय दुसरे विमानतळ नको आहे. या साऱ्याचा विचार, पर्यावरणाचा समतोल आणि संवर्धन यांचा अभ्यास प्राधिकरणाने करावा. नद्यांच्या प्रदूषणाचा विषयही त्याच्याकडे सोपवावा, असा एकत्रित विचार केल्याशिवाय प्रश्न सोडवता येणार नाहीत. महाबळेश्वरचे पाणी सांगलीला आणि नृसिंहवाडी किंबहुना शिरोळ तालुक्याला धक्का देणार असेल तर हा सर्व परिसर समजून घेऊन नियोजन करायला हवे आहे. दरवर्षी महापूर येणार आणि आपण पळापळ करणार. असे कितीवेळा करणार आहोत ? अलमट्टीचा विषय आता संपला आहे. त्यांना धरण भरून घ्यायला आणखी चार महिने आहेत. पावसाळा अद्याप सव्वादोन महिने असताना ऐंशी टीएमसीपेक्षा अधिक पाणी येऊन गेले.

अलमट्टीमध्ये आजही तीन लाख क्युसेक वेगाने पाणी धरणात येत आहे. आपल्याकडील धरणे अद्याप भरायची आहेत. असाच पाऊस ऑगस्टच्या प्रारंभी कोसळला तर परिस्थिती कठीण होईल. आता मदतीला आलेली धरणे भरल्यावर निरर्थक ठरतील. धरणातून पाणी सोडावेच लागेल. पर्याय राहणार नाही. यासाठी सतर्क राहणे आवश्यक, उपाय-योजनाचा आराखडा तयार करणे, महापुराने पाण्याखाली जाणाऱ्या क्षेत्रात बांधकामे होऊ न देणे आदी करणे आवश्यक आहे.


कागल ते सातारा हा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पंचगंगा नदी कोल्हापूरच्या वेशीवर (तावडे हॉटेल स्टाॅप) महामार्ग ओलांडते तेथून शिरोलीच्या सांगली फाट्यापर्यंतचा उंच केलेला रस्ता प्रथम काढून टाकला पाहिजे. या रस्त्याने पाणी अडविले जाते. पाणी पुढे सरकत नाही आणि ते कोल्हापूर शहरात शिरते आहे. या रस्त्यावर मोरी ठेवावी तसे नदीचे पात्र ठेवले आहे. सुमारे एक लाख क्युसेक पाणी त्या पात्रातून कसे जाणार ? त्याच्या फुगवट्याने शिरोलीची शेती पाण्याखाली जाते.


महामार्गावर पाणी येऊन रस्ता बंद पडतो. सांगली फाट्यापासून उंच फ्लायओव्हर बांधून बेळगावकडे जाणारी वाहतूक रिकामी केली पाहिजे. त्याखालून पाणी खेळते राहिले पाहिजे, अन्यथा कोल्हापूर शहराचा धोका कमी होणार नाही. अलीकडेच या रस्त्याची पाहणी झाली तेव्हा हा रस्ता विस्तारणार आणि उंचीही वाढविली जाणार, असे सांगितले गेले. त्या रस्त्यावर आता बेकायदा दुकाने होत आहेत. सांगली रस्त्यावर सुपीक जमिनी बाद करून मार्बलची बाजारपेठच वसली आहे. हे सर्व पूरनियंत्रण क्षेत्रात येते आणि नेते पाहत फिरतात !

Views: 242
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मी आंदोलनाला येतेय… सिने स्टार मेघा घाडगे

मी आंदोलनाला येतेय... सिने स्टार मेघा घाडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)