पत्रकार प्रसाद कडव यांचे कडून शिवजयंती निमित्त सदाशिवराव शिंदे शाळेस शिवमूर्ती भेट
दिघंची प्रतिनिधी
दिघंची- प्रसाद कडव यांचे कडून शिवजयंती निमित्त सदाशिवराव शिंदे शाळेस शिवमूर्ती भेट
देण्यात आली.
आज सदाशिवराव शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल पांढरेवाडी (दिघंची) येथे प्रसाद के न्युज चे संपादक प्रसाद बाळासो कडव यांनी शिवजयंती निमित्त शाळेचे विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेस शिवमूर्ती भेट दिली.
प्रसाद कडव यांना आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्याची आवड आहे. समाजसेवेची आवड आहे. वाढदिवसा निमित्ताने शाळेस जवळ पास ४०,विविध सामाजिक,व्यक्तिरेखा इतिहासबद्दल, शास्तज्ञ, अश्या वेगळ्या विषयावरील पुस्तके भेट दिलेली आहेत. यांच्या या वेगवेगळ्या उपक्रमाचे माध्यमातूनहोत असलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
यावेळेस शाळेचे प्रा.रणजित शिंदे सर, तथा सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.







