इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलामध्ये शिवजयंती मोठ्या उत्सवात संपन्न
दिघंची-दिघंची येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक आदरणीय ईश्वर तात्या मोरे पाटील एकता मोरे पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वातीताई मोरे पाटील मॅडम यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले
अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांवर आपले मनोगत व्यक्त केले पोवाडा सादरीकरण, एकांकिका, नाटक,गीत गायन. नृत्य,लेझीम गाव परिसरातून शिवाजी महाराजांच्या घोषणा देत फेरी काढण्यात आली.
अशा विविध उपक्रम ने शिवजयंती संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर, दीपाली येले, तर आभार आंबूले सर ईशा पिंजारी यांनी केले.यावेळी सर्व विभागाचे प्रमुख शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







